TTD : टीटीडी १ लाख लाडूंचा प्रसाद अयोध्येतील भाविकांना देणार

TTD : टीटीडी १ लाख लाडूंचा प्रसाद अयोध्येतील भाविकांना देणार

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अधिक दिमाखदार करण्याच्या हेतूने तिरूमला तिरूपती देवस्थान (TTD) ने भाविकांसाठी १ लाख लाडू पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुपती देवस्थानच्या लाडूविषयी जगभरातील भाविकांमध्ये विशेष आकर्षण आहे, त्यामुळे या लाडूंची प्रचंड मागणी असते. अयोध्येत (Ayodhya) येणा-या राम भक्तांमध्ये हे लाडू प्रसाद रूपात वाटण्यात येणार असल्याचे TTD ने म्हटले…

E-commerce : फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांत मोठी कर्मचारी कपात होणार

E-commerce : फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांत मोठी कर्मचारी कपात होणार

ऑनलाइन ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी सातत्याने कर्मचा-यांना कामावरून काढत आहे. यावर्षी देखील कामगिरीच्या आधारे फ्लिपकार्टने आपल्या किमान ५ ते ७ टक्के कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे १५०० कर्मचा-यांवर परिणाम होणार आहे. ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टद्वारे…

मिकी माऊस, मिनी माऊस कॉपीराईट मुक्त

मिकी माऊस, मिनी माऊस कॉपीराईट मुक्त

मिकी माऊस आणि मिनी माऊस ही १०० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली कार्टून पात्रे अद्याप लोकप्रिय आहेत. आता ही पात्रे ‘कॉपीराइट’च्या बंधनातून मुक्त झाली आहेत. अमेरिकेतील कायद्यानुसार ‘डिस्रे’च्या या लाडक्या पात्रांवरील खासगी हक्क संपुष्टात आला. आता त्यांचा इतरांनाही वापर करता येणार आहे. ‘डिस्रे’ने १९२८ मध्ये ‘स्टीमबोट विली’ या लघुपटाद्वारे मिकी माऊस आणि मिनी माऊस ही पात्रे…

SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

भारतीय म्युच्युअल फंड (MF) उद्योगातील (AUM) व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. AUM वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील वाढ आणि फंडांच्या गुंतवणुकीत सातत्याने झालेली वाढ होय. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ओपन-एंडेड स्कीम्स अंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ५०.८० लाख कोटी रुपये होती, तर नोव्हेंबर २०२३ मध्ये हा…

Adani Deal : अदानींनी केले ACCPL चे अधिग्रहण, ७७५ कोटींची मोठी डील

Adani Deal : अदानींनी केले ACCPL चे अधिग्रहण, ७७५ कोटींची मोठी डील

अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील एसीसी लिमिटेड या कंपनीने एसीसीपीएल नावाच्या कंपनीचे अधिग्रहण अखेर पूर्ण केले. सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचे वर्चस्व वाढवणारा हा करार ८ जानेवारी रोजी, (सोमवारी) एकूण ७७५ कोटी रुपयांना पूर्ण झाला. नवीन वर्षात अदानी समूहाच्या या पहिल्या मोठ्या डीलचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे. ACC लिमिटेड ही अदानी समूहातील सिमेंट फर्म…

MLA Disqualification : शिंदे गट भाजपात विलीन होणार, पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार?

MLA Disqualification : शिंदे गट भाजपात विलीन होणार, पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार?

  १० जानेवारीला दुपारी ४ वाजता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा फैसला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अनुषंगाने भाजपाने प्लॅन बी तयार ठेवला असून, या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. येत्या १० जानेवारीला दुपारी ४ नंतर या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. हा निकाल एकनाथ शिंदे…

Union Budget : दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सवलती, पदोन्नती बंद?

Union Budget : दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सवलती, पदोन्नती बंद?

दोन पेक्षा जास्त मुले असल्यास संबंधित व्यक्तिला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिला जाऊ नये. पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने ईमेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना सूचना केली आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पासंदर्भात लोकांची मते मागवण्यात आली….

ताडोबा : ‘नयनतारा’ने पाण्याच्या बाटलीसह धूम ठोकली!

ताडोबा : ‘नयनतारा’ने पाण्याच्या बाटलीसह धूम ठोकली!

ताडोबामधील भानुसखिंडीतील नयनतारा नावाच्या एका बछड्याने चक्क पाण्याची प्लास्टिक बाटली तोंडात घेऊन पळ काढला. हा प्रकार जांभूळडोह येथे घडला. हे दृश्य छायाचित्रकार विवान कारापूरकर यांनी टिपले. मुळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक बंदी असताना ही प्लॅस्टिकची बाटली जंगलात आलीच कशी, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. ताडोबातील अलिझंजा आणि रामदेगी बफर झोन परिसरात गेल्या काही…

HAMAS : इस्त्राईली हल्ल्यात ‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा; ८ हजार दहशतवादी ठार

HAMAS : इस्त्राईली हल्ल्यात ‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा; ८ हजार दहशतवादी ठार

उत्तर गाझातील सुमारे ८ हजार दहशतवाद्यांचा खात्मा इस्त्राईली सैनिकांनी केला. याशिवाय परिसरातील हजारो शस्त्रे आणि लाखो कागदपत्र जप्त करण्यात आली. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन झाले, त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडर देखील नसल्याचे इस्त्राईली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केले. जबलिया भागात बटालियन कमांडर, डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि ११ कंपनी कमांडर मारले आहेत….

अयोध्येतील श्रीरामाचे डोळे प्राणप्रतिष्ठेनंतरच उघडणार!

अयोध्येतील श्रीरामाचे डोळे प्राणप्रतिष्ठेनंतरच उघडणार!

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस आता समीप येऊन ठेपला आहे. या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी रोजी केले जाणार आहे. तथापि, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत श्रीराम मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. यामागे शास्त्र असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी तो देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव…