SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

SIP मध्ये १७,६१० कोटींची उच्चांकी गुंतवणूक

भारतीय म्युच्युअल फंड (MF) उद्योगातील (AUM) व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. AUM वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे शेअर बाजारातील वाढ आणि फंडांच्या गुंतवणुकीत सातत्याने झालेली वाढ होय. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये ओपन-एंडेड स्कीम्स अंतर्गत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ५०.८० लाख कोटी रुपये होती, तर नोव्हेंबर २०२३ मध्ये हा…

Adani Deal : अदानींनी केले ACCPL चे अधिग्रहण, ७७५ कोटींची मोठी डील

Adani Deal : अदानींनी केले ACCPL चे अधिग्रहण, ७७५ कोटींची मोठी डील

अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील एसीसी लिमिटेड या कंपनीने एसीसीपीएल नावाच्या कंपनीचे अधिग्रहण अखेर पूर्ण केले. सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचे वर्चस्व वाढवणारा हा करार ८ जानेवारी रोजी, (सोमवारी) एकूण ७७५ कोटी रुपयांना पूर्ण झाला. नवीन वर्षात अदानी समूहाच्या या पहिल्या मोठ्या डीलचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे. ACC लिमिटेड ही अदानी समूहातील सिमेंट फर्म…

MLA Disqualification : शिंदे गट भाजपात विलीन होणार, पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार?

MLA Disqualification : शिंदे गट भाजपात विलीन होणार, पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार?

  १० जानेवारीला दुपारी ४ वाजता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा फैसला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अनुषंगाने भाजपाने प्लॅन बी तयार ठेवला असून, या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. येत्या १० जानेवारीला दुपारी ४ नंतर या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. हा निकाल एकनाथ शिंदे…

Union Budget : दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सवलती, पदोन्नती बंद?

Union Budget : दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सवलती, पदोन्नती बंद?

दोन पेक्षा जास्त मुले असल्यास संबंधित व्यक्तिला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिला जाऊ नये. पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने ईमेल आणि वेबसाईटच्या माध्यमातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांना सूचना केली आहे. येत्या १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पासंदर्भात लोकांची मते मागवण्यात आली….

ताडोबा : ‘नयनतारा’ने पाण्याच्या बाटलीसह धूम ठोकली!

ताडोबा : ‘नयनतारा’ने पाण्याच्या बाटलीसह धूम ठोकली!

ताडोबामधील भानुसखिंडीतील नयनतारा नावाच्या एका बछड्याने चक्क पाण्याची प्लास्टिक बाटली तोंडात घेऊन पळ काढला. हा प्रकार जांभूळडोह येथे घडला. हे दृश्य छायाचित्रकार विवान कारापूरकर यांनी टिपले. मुळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक बंदी असताना ही प्लॅस्टिकची बाटली जंगलात आलीच कशी, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. ताडोबातील अलिझंजा आणि रामदेगी बफर झोन परिसरात गेल्या काही…

HAMAS : इस्त्राईली हल्ल्यात ‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा; ८ हजार दहशतवादी ठार

HAMAS : इस्त्राईली हल्ल्यात ‘हमास’च्या म्होरक्याचा खात्मा; ८ हजार दहशतवादी ठार

उत्तर गाझातील सुमारे ८ हजार दहशतवाद्यांचा खात्मा इस्त्राईली सैनिकांनी केला. याशिवाय परिसरातील हजारो शस्त्रे आणि लाखो कागदपत्र जप्त करण्यात आली. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन झाले, त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडर देखील नसल्याचे इस्त्राईली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केले. जबलिया भागात बटालियन कमांडर, डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि ११ कंपनी कमांडर मारले आहेत….

अयोध्येतील श्रीरामाचे डोळे प्राणप्रतिष्ठेनंतरच उघडणार!

अयोध्येतील श्रीरामाचे डोळे प्राणप्रतिष्ठेनंतरच उघडणार!

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस आता समीप येऊन ठेपला आहे. या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी रोजी केले जाणार आहे. तथापि, प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत श्रीराम मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाणार आहे. यामागे शास्त्र असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी तो देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव…

मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार : अजित पवारांचे संकेत

मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार : अजित पवारांचे संकेत

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी तयारीला लागावे, नव्या कार्यकर्त्यांची फळी तयार करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी आपण जमलो आहोत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी ठाणे येथील मेळाव्यात केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर वयाच्या…

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण

भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली. या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत…

नवाब मलिक धर्मसंकटात; फडणवीसांची गोची, तर अजित दादांसमोर पेच!

नवाब मलिक धर्मसंकटात; फडणवीसांची गोची, तर अजित दादांसमोर पेच!

  राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक यांची तुरुंगातून आजारपणाच्या कारणावरून जामिनावर सुटका झाली आणि ते नागपूर ला हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाले. मात्र ते विधानसभा सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाजूला बसल्याने एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे याबाबत विधानसभा सभागृहात कुणी माहिती विचारली नाही. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिक यांच्या विधानसभेतील उपस्थितीचा…