khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

MLA Disqualification : शिंदे गट भाजपात विलीन होणार, पुन्हा ठाकरेंना धक्का बसणार?

 

१० जानेवारीला दुपारी ४ वाजता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा फैसला

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या अनुषंगाने भाजपाने प्लॅन बी तयार ठेवला असून, या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

येत्या १० जानेवारीला दुपारी ४ नंतर या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे. हा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात लागला तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागू शकते. मात्र यापूर्वीच शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार ठेवला आहे.

या निकालाकडे सा-या महाराष्ट्रासोबतच देशाचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार आहेत.

दरम्यान एकनाथ शिंदे गटाने शिवसेना एकच आहे, फक्त आम्ही शिवसेनेत नेतृत्व बदल केल्याचा दावा केला, आणि या मुद्द्यांचा आधारे शिंदे यांना अपात्रता प्रकरणी दिलासा मिळू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील कायदेतज्ज्ञांकडे पाठविला आहे. यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचाही आधार घेतल्याचे समजते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »