khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

TTD : टीटीडी १ लाख लाडूंचा प्रसाद अयोध्येतील भाविकांना देणार

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अधिक दिमाखदार करण्याच्या हेतूने तिरूमला तिरूपती देवस्थान (TTD) ने भाविकांसाठी १ लाख लाडू पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुपती देवस्थानच्या लाडूविषयी जगभरातील भाविकांमध्ये विशेष आकर्षण आहे, त्यामुळे या लाडूंची प्रचंड मागणी असते. अयोध्येत (Ayodhya) येणा-या राम भक्तांमध्ये हे लाडू प्रसाद रूपात वाटण्यात येणार असल्याचे TTD ने म्हटले आहे. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून लाखो भाविक २२ तारखेला अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तिरुपतीमध्ये भाविकांमध्ये वाटल्या जाणा-या लाडूंचे वजन १७६ ग्रॅम ते २०० ग्रॅम असते. पण, अयोध्येला पाठवल्या जाणा-या लाडूंचे वजन फक्त २५ ग्रॅम असेल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »