Nashik : ज्ञानपीठ आधार आश्रमात संचालकाचा ‘हैदोस’

Nashik : ज्ञानपीठ आधार आश्रमात संचालकाचा ‘हैदोस’

नाशिक : शहरालगतच्या म्हसरूळ येथील ज्ञानपीठ आधार आश्रमाच्या संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वीच या प्रकरणी एका पीडितेने तक्रार दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर आणखी काही अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. नाशिक (Nashik) येथील म्हसरुळ परिसरातील ज्ञानपीठ आधार आश्रमाचा संचालक हर्षल मोरे याने हे कृत्य केले….

FIFA 2022 : ऑस्ट्रेलियाचा एकच गोल; साऱ्या जगाचा ढळला तोल!!

FIFA 2022 : ऑस्ट्रेलियाचा एकच गोल; साऱ्या जगाचा ढळला तोल!!

 ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि ट्युनिशिया यांच्यात चुरशीचा सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने १-० असा जिंकत विश्वचषकाची विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल ड्युकने पहिल्याच हाफमध्ये २३ व्या मिनिटाला गोल केला. विशेष म्हणजे या विजयाबरोबर ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेमध्ये तीन वेगवेगळ्या खंडातील संघांना पराभूत करणारा तिसरा संघ ठरला आहे. आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील संघांचा वेगवेगळ्या…

Lay Off : आयटी इंजिनीअर्सवर टाळेबंदीची ‘संक्रांत’

Lay Off : आयटी इंजिनीअर्सवर टाळेबंदीची ‘संक्रांत’

नवी दिल्ली : ट्विटरमधील टाळेबंदीमुळे ट्विटर अजूनही चर्चेत आहे. त्यापाठोपाठ आता HP Inc या दिग्गज कंपनीने देखील Cost cutting चा मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे देशभरात आणि जगातील अनेक कंपन्यांमधून नवीन नोकरभरतीच्या बातम्या येत आहेत. तर, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले जात आहे. त्यास Amazon, Meta देखील अपवाद नाहीत. एकुणात सातत्याने कमी होत चाललेली मागणी,…

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

भाजप देणार २० लाख नोकऱ्या, १० लाखांचा आरोग्य विमा

गांधीनगर : गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपसाठी निर्णायक ठरू जात आहे. या निवडणुकीत एक हाती विजयाची शक्यता धूसर बनल्यामुळेच राज्यातील जेष्ठ नागरिक आणि युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता २० लाख नोकऱ्या आणि १० लाखाच्या आरोग्य विम्याचे गाजर पक्षाच्या जाहीरनाम्यातून दाखवले गेले आहे. आज शनिवारी भारतीय जनता पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात…

नवजात मुलीला आढळले, ६ से.मी.चे शेपूट

नवजात मुलीला आढळले, ६ से.मी.चे शेपूट

मेक्सिको : अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये एका चिमुकलीला जन्मताच सहा सेंटीमीटरचे शेपूट असल्याचे आढळले. हा अजब प्रकार पाहून डॉक्टर्सही हैराण झाले आहेत. अमेरिकेतील ही अशाप्रकारची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर- पूर्व मेक्सिकोतील Nuevo Leon राज्यातील एका ग्रामीण रुग्णालयात या अनोख्या चिमुकल्या मुलीचा जन्म झाला. तेव्हा डॉक्टरांना मुलीला एक शेपुट असल्याचे लक्षात आले. हे शेपुट ५.७…

lockdown : थंडीला बहर; कोरोनाचा कहर

lockdown : थंडीला बहर; कोरोनाचा कहर

बिजिंग : चीनमध्ये जसा थंडीचा कडाका वाढतो आहे, त्या पाठोपाठ कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गुरुवारी हाती आलेल्या माहितीनुसार कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत संसर्गाच्या आकडेवारीने उच्चान्क गाठला आहे. चीनमध्ये बुधवारी ३१ हजार ४५४ नवीन रुग्ण सापडले. ज्यातील २७ हजार ५१७ रुग्णांमध्ये नवीन लक्षणे नाहीत. चीनमधील सध्याची लोकसंख्या पाहता कोरोना रुग्णांचा हा आकडा फारच…

Air India : टिकली, नेलपेंट, लिपस्टिकपासून क्रू मेंबर्सचा ‘मेकओव्हर’

Air India : टिकली, नेलपेंट, लिपस्टिकपासून क्रू मेंबर्सचा ‘मेकओव्हर’

नवी दिल्ली : ‘एअर इंडिया’ला पुन्हा जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवण्यासाठी टाटा समूह सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यात एअर इंडियाचा सुकाणू टाटांच्या हाती आल्यापासून व्यवस्थेत अनेक बदल करण्यात येत आहेत. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महिला कर्मचाऱ्यांसाठी टिकलीचा आकार, बांगड्यांची संख्या आणि लिपस्टिक आणि नेलपेंटचा रंग या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. सहयोगी कर्मचाऱ्यांच्या (क्रू मेंबर्सच्या) प्रशिक्षणासाठी…

UPI : ३१ डिसेंबर पूर्वीच पेमेंटवर निर्बंध?

UPI : ३१ डिसेंबर पूर्वीच पेमेंटवर निर्बंध?

मुंबई : देव-घेवीच्या व्यवहारासाठी रोख पैसे न वापरता फोनमधले पेमेंट अ‍ॅप्स वापरून व्यवहार करण्याचे प्रमाण सध्या बरेचसे वाढले आहे. लोकांनाही हा पर्याय सोयिस्कर ठरतो आहे. रोख पैशाचे पाकीट सांभाळण्यापेक्षा फोनवरून पेमेंट करण सोपे होते. अगदी किरकोळ खरेदीपासून मोठ्या व्यवहारापर्यंत UPI Payment करण्याची तुम्हाला सवय असेल तर ही Breaking News तुमच्यासाठीच आहे. युपीआय पेमेंटवर सध्या बहुतेक…

Burning zappi : औरंगाबादेत ‘बर्निंग झप्पी’चा प्रयोग !

Burning zappi : औरंगाबादेत ‘बर्निंग झप्पी’चा प्रयोग !

औरंगाबाद : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या देशभर गाजत आहे, यादरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातून ‘बर्निंग झप्पी’ची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत हे दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान,…

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर…