औरंगाबाद : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या देशभर गाजत आहे, यादरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातून ‘बर्निंग झप्पी’ची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत हे दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या तरुणाने स्वतःला पेटवून का घेतले याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला की दोघे एकमेकांना ओळखत होते याबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही.