khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Quake : जाकार्तामध्ये भूकंप! २० ठार, ३०० जखमी

जाकार्ता : इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जाकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपात २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपात घरांची पडझड झाली आहे.

इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सोमवारी ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे हवामानशास्त्र आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर होता. मात्र, यामुळे सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही.

 जाकार्तामध्ये भूकंपानंतर लोक घाबरले. त्यांच्या कार्यालयात काम करणारे लोकही बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरत असल्याचे दिसून आले. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

गेल्या शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून २०२ किमी नैऋत्येस २५ किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता ५.४ होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like