khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

UPI : ३१ डिसेंबर पूर्वीच पेमेंटवर निर्बंध?

मुंबई : देव-घेवीच्या व्यवहारासाठी रोख पैसे न वापरता फोनमधले पेमेंट अ‍ॅप्स वापरून व्यवहार करण्याचे प्रमाण सध्या बरेचसे वाढले आहे. लोकांनाही हा पर्याय सोयिस्कर ठरतो आहे. रोख पैशाचे पाकीट सांभाळण्यापेक्षा फोनवरून पेमेंट करण सोपे होते. अगदी किरकोळ खरेदीपासून मोठ्या व्यवहारापर्यंत UPI Payment करण्याची तुम्हाला सवय असेल तर ही Breaking News तुमच्यासाठीच आहे.

युपीआय पेमेंटवर सध्या बहुतेक नागरिक अबलंबून आहेत. बँक व्यवहाराप्रमाणेच UPI पेमेंटला निश्चित मर्यादा घालण्याविषयी संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत. एक मात्र निश्चित कि, लवकरच युपीआय पेमेंटवर निर्बंध लादले जाणार आहेत.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे. यामुळे मोबाईल ॲपद्वारे बँक खात्यात पैसे एकमेकांना पाठवता येतात. यासह, कोणताही वापरकर्ता अनेक UPI ॲप्ससह बँक खाते लिंक करू शकतो आणि व्यवहार करू शकतो. दरम्यान, आता UPI पेमेंट सेवा देणाऱ्या ॲप्ससाठी व्यवहार मर्यादा निश्चित करण्याची तयारी सुरू झाली आहे.

थर्ड पार्टी UPI पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा लवकरच निश्चित केली जाऊ शकते, केंद्र सरकारकडून यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI थर्ड पार्टी UPI पेमेंटची एकूण व्यवहार मर्यादा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याच्या निर्णयावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत चर्चा करत आहे.

या चर्चेत NPCI, वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) अधिकारी सहभागी झाले आहेत. यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. जर हा निर्णय मार्गी लागला तर गुगल पे आणि फोन पे सारख्या ॲप पेमेंटवर मर्यादा येतील. 31 डिसेंबर 2022 पर्यंत नवीन नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like