khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Air India : टिकली, नेलपेंट, लिपस्टिकपासून क्रू मेंबर्सचा ‘मेकओव्हर’

नवी दिल्ली : ‘एअर इंडिया’ला पुन्हा जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवण्यासाठी टाटा समूह सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यात एअर इंडियाचा सुकाणू टाटांच्या हाती आल्यापासून व्यवस्थेत अनेक बदल करण्यात येत आहेत. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महिला कर्मचाऱ्यांसाठी टिकलीचा आकार, बांगड्यांची संख्या आणि लिपस्टिक आणि नेलपेंटचा रंग या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत.

सहयोगी कर्मचाऱ्यांच्या (क्रू मेंबर्सच्या) प्रशिक्षणासाठी देखील नवी मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार आता महिला आणि पुरुष सहयोगी कर्मचाऱ्यांना (क्रू मेंबर्सना) या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महिला कर्मचाऱ्यांसाठी टिकलीचा आकार, बांगड्यांची संख्या आणि लिपस्टिक आणि नेलपेंटचा रंग या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत.

एअर इंडियाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कर्मचाऱ्यांना ऑफ-ड्युटी कंपनीचा गणवेश आणि अॅक्सेसरीज न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय क्रू मेंबर्सना केसांना जेल लावणे सक्तीचे करण्यात आले. तसेच, ज्या पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोक्यावरीस केस कमी झाले असतील त्यांना आता पूर्णपणे हेअर स्टाईल बदलावी लागेल. क्रू कटवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महिला क्रू मेंबर्सना आता मोत्याचे कानातले न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय महिला क्रू मेंबर्स त्यांच्या कानात फक्त सोन्याचे किंवा चांदीचे गोल आकाराचे झुमके घालू शकणार आहेत. तसेच ०.५ सेमीचीच टिकली लावावी लागणार आहे. याशिवाय विमान प्रवासात महिलांना हातात केवळ एकच बांगडी घालण्याची परवानगी असेल, ज्यामध्ये कोणतेही डिझाइन किंवा स्टोन असणार नाही.

महिला केबिन क्रू यापुढे हाय टॉप नॉट्स हेअरस्टाइल करू शकणार नाहीत. केसांमध्ये फक्त चार काळ्या बॉबी पिनला परवानगी असेल. याशिवाय आयशॅडो, लिपस्टिक, नेल पेंट आणि केसांचा रंगही ठरवून देण्यात आला आहे. ज्या महिला आणि पुरूष कर्मचाऱ्यांचे केस पांढरे झाले आहेत त्यांना यापुढे केसांना कलप (हेअर डाय) लावावा लागणार आहे. केसांना लावण्यात येणारे हे रंग नैसर्गिक असावेत, असेही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. केसांना फॅशनेबल रंग किंवा मेंदी लावण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मानेवर, मनगटावर आणि घोट्यावर कोणतेही धार्मिक चिन्ह गोंदवण्यास परवानगी दिलेली नाही.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »