सत्तार, भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर गंडांतर

सत्तार, भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर गंडांतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. २९ जून) रात्री अचानक दिल्ली दौरा केल्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा एकदा वेग धरला आहे. या दरम्यान, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबतच संदीपान भुमरे, संजय राठोड यांच्या मंत्री पदावर गंडांतर येण्याची चिन्हे अधिक गडद झाली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या…

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान

पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून…

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय – वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव – एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी…

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला !

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला !

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे ४ आठवड्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालेल. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. तत्पूर्वी प्रथेप्रमाणे ‘वंदे मातरम्’ गीत होईल; मात्र पहिल्यांदाच ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीतही होईल. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही…

महाराष्ट्राचं राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘

महाराष्ट्राचं राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून आज घोषित करण्यात आले. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे राज्यगीत लागू करण्यात येणार आहे. शाहीर साबळे यांनी…

MPSC नोकर भरती २०२३; लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा

MPSC नोकर भरती २०२३; लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा

MPSC नोकर भरती २०२३ लिपिक-टंकलेखक पदाच्या ७०३४ जागा मुंबई : MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब…

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

ST : ‘एसटी’ची संक्रांत झाली गोड ! मिळाला ३०० कोटींचा तिळगूळ !!

औरंगाबाद : जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी संतापले होते. दरम्यान, राज्य सरकारने ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारने ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत. महाआघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन…

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

Maharashtra Govt. : शिंदे सरकारने दिला, नोकरदारांना २४० कोटींचा तिळगुळ !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांना संक्रांतीपूर्वीच २४० कोटींचा तिळगुळ दिला. तथापि, हा तिळगुळ काल्पनिक (virtual) असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासूनची प्रत्यक्ष थकबाकी तात्काळ मिळणार नाही. पण, सुधारित वेतनलाभ आदेश निघाल्याच्या तारखेपासून तो लागू केला जाणार आहे. सहाव्या व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणाऱ्या बक्षी…

Jobs : ७५ हजार नोकर भरती रखडणार

Jobs : ७५ हजार नोकर भरती रखडणार

मुंबई : राज्यातील ७५ हजार नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार आता समिती स्थापन करणार आहे. तथापि, TCS आणि IBPS कडे मर्यादित ऑनलाईन परीक्षा केंद्र असल्याने ही नोकर भरती रखडण्याची शक्यता अधिक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. येत्या दोन दिवसात यावर निर्णय होणार आहे. एवढी मोठी नोकरभरती राबविण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर समिती…

River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

River Pollution : अमृत वाहिनीचे शुद्धीकरण !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ‘चला जाणूया नदीला’ हा उपक्रम आखला आहे. अमृत वाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदावरी व तिच्या उपनद्या (मराठवाडा), कृष्णा, भीमा व तिच्या उपनद्या (पश्चिम महाराष्ट्र), नाग व अन्य नद्या (विदर्भ), पंचगंगा (दक्षिण महाराष्ट्र) अशा अनेक नद्यांचा समावेश आहे. या प्रत्येक नदीची काही…