khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, (२८ जून) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

– वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

– एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव

– राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता

– भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ

– महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार, आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.

– संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ

– आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार

– नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश

– मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.

– पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार

– मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड

– भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण

– मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल, वरूड, फलटण येथे न्यायालये

– राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र

– सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन

– पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार

– बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित

– जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता

– राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता

– बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय

– दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार

– दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ

– देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता

– चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

– सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ

– गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता

– ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

– पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार

– पर्यटन उपविभागासाठी उप सचिव

फ्रेश अपडेटसाठी; वाचत राहा khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like