khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

महाराष्ट्राचं राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा… ‘

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून आज घोषित करण्यात आले. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे राज्यगीत लागू करण्यात येणार आहे.

शाहीर साबळे यांनी गायलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत कवी राजा बढे यांनी लिहिलं आहे. श्रीनिवास खळे हे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गीताची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्रावर या गाण्याने गरुड केले आहे.

महाराष्ट्र गीत …

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

(सौजन्य : विकिपीडिया)

गीत – राजा बढे, संगीत – श्रीनिवास खळे, गायक – शाहीर साबळे

तुमच्या उपयोगाची बातमी, वाचत रहा khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like