
AIMIM | ‘एमआयएम’चा भाजपला फायदा किती? नांदेडमध्ये ठरणार पक्षाचे भवितव्य!
नांदेड : विशेष प्रतिनिधी ‘एमआयएम’ने २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४४ जागा लढवल्या. त्यामध्ये धुळे आणि मालेगाव मध्य या दोन मतदारसंघात त्यांचे उमेदवार विजयी झाले. पक्षाला मिळालेल्या एकूण मतांची टक्केवारी १.४४ टक्के होती. जी २०१४ साली २२ जागा लढवून मिळवलेल्या ०.९३ टक्के मतांच्या तुलनेत कमी आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष आणि अल्पसंख्याक मतदारांना प्रभावित करण्याची पक्षाची क्षमता मर्यादीत