khabarbat

Manoj Jarange Patil Health Update Today...

Advertisement

मनोज जरांगे सलाईनवर, प्रकृतीत हळू-हळू सुधारणा

आंतरवाली सराटी (जालना) । khabarbat News Network

मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मनोज जरांगेना भेटण्यासाठी येणारे विविध पक्षांचे पदाधिकारी, आमदार, खासदार हे रात्री उशिरा येतात. त्यांची चर्चा ही उशिरापर्यंत सुरु असते. त्यामुळे जरांगे पाटील यांचे सतत जागरण होत आहे.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं उपोषण करत असल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना काल रात्रीपासून ताप, अशक्तपणाचा त्रास होत आहे. तापासोबत त्यांना इन्फेक्शन देखील झाले आहे. तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घसादुखी आणि कफ झाला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांची काल रात्री तब्येत बिघडल्याने त्यांना घरीच सलाईन लावण्यात आले. तसेच त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहे. ते नमुने अधिक तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आज सकाळीही मनोज जरांगेंना सलाईन लावण्यात आले आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »