
दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी
विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नानांच्या नेतृत्वावरून सुरु झालेले मतभेद अखेर दुफळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी प्रकरणाच्या निमित्ताने सारी खदखद बाहेर येत आहे. मुळात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद होत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे. तरीही काँग्रेस श्रेष्ठी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस संपुष्टात आणण्याचे फारसे प्रयत्न करतील