khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

‘Valentine day’ ठरतोय Breakup day कारण …

विश्लेषण / श्रीपाद सबनीस

‘रेडिट’ने अलीकडेच Break Up या विषयावर चाचणी घेतली. सुमारे ७ हजार जणांना कल चाचणीत सामील करून घेण्यात आले . सोशल मीडिया फीड अर्थातच संबंधित व्यक्तीने लिहिलेल्या पोस्ट्सच्या माध्यमातून सामाजिक, भावनिक आणि आकलनाच्या आधारे या व्यक्तींचा धांडोळा घेण्यात आला. याद्वारे असे निदर्शनास आले कि, संबंधित व्यक्ती त्याच्या जोडीदाराशी ब्रेकअप घेणार असल्याचे संकेत फेसबुक तसेच इन्स्टाग्राम सारखे सोशल मीडिया अकाउंट सहजपणे देऊ शकते.

या सर्व्हेचा महत्वाचा फायदा म्हणजे ब्रेकअपनंतर नैराश्य, तणाव यासारख्या मानसिक आघातापासून संबंधित व्यक्तीला वाचवणे शक्य होऊ शकते.

Break Up पूर्वी होणारे बदल ….

१) सोशल मीडिया पोस्ट लिहिण्याची पद्धत बदलते.
२) व्यक्ती ‘मी’ किंवा ‘मला’ सारखे शब्द वापरू लागते.
३) जोडीदाराच्या फोटोंवर कमेंट करणे थांबवते.
४) जर जोडीदाराने त्याला टॅग करून एखाद्या गोष्टीशी सहमती देण्याचा प्रयत्न केला तर, त्या बदल्यात तो/ती ‘कदाचित’ किंवा ‘विचार करेन’ अशा शब्दांत उत्तर देतो.
५) ती व्यक्ती सोशल मीडियावर जोडप्याचे फोटो पोस्ट करणे थांबवते.
६) फोटोमध्ये त्याचे भविष्य आणि स्वप्ने दाखवण्याचा प्रयत्न करतो.

असे संकेत दिसत असतील तर तुमच्या जोडीदाराशी समोरासमोर बोला. आपल्या जोडीदाराशी कन्फर्म करा की त्याच्या नात्याबद्दल गंभीर तर नाही. तसे असेल तर दोघांनी सहमतीने ब्रेकअप केले पाहिजे.

सहमतीने ब्रेकअपचे ४ फायदे

१) ब्रेकअप नंतर तुम्ही डिप्रेशनच्या आहारी जाणार नाही.
२) नात्याबाबत तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत.
३) तुम्ही तुमच्या जुन्या जोडीदाराबद्दल वाईट वाटत विचार करत नाही, मैत्री कायम राहते.

समजा, ब्रेकअप झाला आणि नंतर मैत्री ठेवावी की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुमचे नाते खूप जुने असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भविष्यात चांगले मित्र ठरू शकाल तर काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मैत्रीचा हात दोन्ही बाजूंनी असायला पाहिजे. एकतर्फी मैत्री फक्त तुम्हाला त्रास देईल.

Heart break खरंच होतो का?

आपण अनेकदा म्हणतो की Heart break चा आवाज येत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की, हृदय केवळ कवी कल्पनेत तुटत नाही. ते खरोखरच break होते. त्यास ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी म्हणजेच ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणतात. हेच ब्रेकअपचे कारण ठरते.

ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये स्नायू सैल होतात. हृदयाचा आकार जपानमधील मच्छिमार ऑक्टोपस पकडण्यासाठी वापरणाऱ्या जाळ्यासारखा होतो. या जाळ्याला जपानी भाषेत ताकोत्सुबो म्हणतात. त्यावरून ब्रोकन हार्ट सिंड्रोमचे नाव ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी असे झाले.

भारतात सर्वाधिक ब्रेकअप व्हॅलेंटाईन डे व्यतिरिक्त, कॉलेजमधील नवीन सत्राच्या सुरुवातीला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नाच्या हंगामात होतात. ही तिच वेळ आहे जेव्हा नवीन लोक भेटतात आणि नवीन नातेसंबंध तयार होतात. त्याच वेळी, ख्रिसमसच्या दरम्यान परदेशात सर्वाधिक ब्रेकअप होतात.

तुमच्यासाठी उपयोगाची महत्वाची बातमी वाचत रहा khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like