
Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल
नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी