khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Water Heritage : नहर-ए-अंबरी आणि पाणचक्कीचा समावेश

औरंगाबाद I ऐतिहासिक स्थळांचे शहर म्हणून ओळख असलेल्या औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. कारण देशभरातील वॉटर हेरिटेज स्थळांची घोषणा शुक्रवारी (७ जानेवारी २०२३) केंद्र सरकारने केली असून, ज्यात औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरीची आणि नहर-ए-पाणचक्कीची नोंद करण्यात आली आहे.

देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला असल्याने औरंगाबादची आणखी एक नवीन ओळख राष्ट्रीय पातळीवर नोंदवली गेली आहे. अजिंठा-वेरूळ लेणी, बीबी का मकबरा आणि वेगवेगळी ऐतिहासिक स्थळे आणि धार्मिक स्थळांमुळे औरंगाबादची ओळख देशभरासह जगाच्या नकाशावर आहे.

त्यामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांतील पर्यटकांसह विदेशी पर्यटक देखील रोज औरंगाबादला भेट देत असतात. अशातच आता औरंगाबादच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील ४०० वर्षे जुन्या नहर-ए-अंबरी, नहर-ए-पाणचक्कीची केंद्र सरकारच्या जलशक्ती मिशन मंत्रालयाने नोंद घेतली आहे. देशभरातील ७५ जलसाठ्यांमध्ये या दोन नहरींचा समावेश करण्यात आला आहे.

२०२१ मध्ये तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी औरंगाबादेतील नहरींचा केंद्र शासनाने जलशक्ती मिशनमध्ये समावेश करावा, यासाठी पाठपुरावा केला होता. तर विद्यमान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी आणि त्यांच्या टीमने यासाठी केंद्राकडे विविध माहिती सादर केली होती. त्यामुळे अखेर जलशक्ती मिशन मंत्रालयाने वॉटर हेरिटेज स्थळांमध्ये या दोन्ही नहरींचा समावेश केला आहे.

तंत्रज्ञानाची जोड नसतानाही नहर-ए-अंबरीची निर्मिती
मलिक अंबर यांनी १७ व्या शतकात म्हणजेच १६६२ मध्ये आपल्या आधिपत्याखालील औरंगाबाद शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ‘सायफन’ पद्धतीचा वापर करून ‘नहर-ए-अंबरी’नावाची पाणीपुरवठा योजना आखली होती. विशेष म्हणजे त्या काळात कोणत्याही तंत्रज्ञानाची जोड नसताना शहरातील खाम नदीच्या उगमस्थानी प्रथम पाणी अडविण्यासाठी तलाव बांधण्यात आला. याच तलावातील साठवलेले पाणी सुमारे चार मैल अंतरावरील ऐतिहासिक मकबरा वास्तूपर्यंत आणण्यासाठी नहरी म्हणजेच कालव्याचा मार्ग खोदून ते पाणचक्कीपर्यंत आणले गेले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like