khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Crime : आईच्या सांगण्यावरून पत्नीसह मुलाची हत्या

औरंगाबाद I औरंगाबाद शहर आज दुहेरी हत्याकांडाने हादरले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. या घटनेने औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

उल्लेखनीय म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. दरम्यान पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार औरंगाबादमधील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के दांपत्य राहत होते. यामध्ये अडीच वर्षांचा मुलगा पत्नी आणि आरोपीची आई एकत्र राहत होते.

मात्र आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद देखील झाले. दरम्यान काल या पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर समीर मस्के याने मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आणि मुलगा निशात यांची गळा आवळून हत्या केली.

याप्रकरणी औरंगाबाद मधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले, तर आरोपी समीर मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like