khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Firing : काँग्रेसच्या महिलेवर गोळीबार; परभणीच्या दोघांवर गुन्हा दाखल

नांदेड | नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंट जवळ असलेल्या उड्डाण पुलावर गोळीबार करण्यात आला. यात सदर महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली असून त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेड शहरातील शक्तीनगर भागात राहणाऱ्या सविता गायकवाड ह्या रात्री आपल्या दुचाकीवरून मगनपुरा येथे अकराच्या सुमारास जात होत्या. यावेळी त्यांची दुचाकी बाफना उड्डाणपूलाजवळ येताच त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरून व ओळखीचा असलेल्या रहीम खान आणि जफर या परभणीच्या दोघांनी व त्यांच्यासोबत एक अनोळखी यांनी सविता गायकवाड यांना थांबवले. ओळख असल्यामुळे सविता गायकवाड थांबल्या. यावेळी त्यांनी वाद घालून आपल्या जवळील पिस्तूलमधून गोळी मारली.

यावेळी यात त्यांच्या डाव्या दंडातून गोळी आरपार बाहेर पडली आणि त्या जखमी झाल्या. यानंतर हल्लेखोर पसार झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सविता गायकवाड आणि अतीक या दोघांवर आयशर खरेदी विक्रीच्या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अतीक याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र सविता गायकवाड यांना 14 (1) ( अ) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले होते. या प्रकरणात परभणी येथील रहीमखान याने साक्ष दिली होती. याचा राग मनात असल्याने सात जानेवारी रोजी सविता गायकवाड आणि फैसल हे दोघेजण परभणी येथे जाऊन रहीम खान याच्या घरात जावून जाब विचारला. रहीमखान याच्या घरात त्यांनी गोंधळही घातल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी परभणी शहरात या दोघांविरुद्ध भादविच्या 452, 325, 506 गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे पोलीस निरीक्षक धबडगे यांनी सांगितले. मात्र जखमी सविता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध भादविच्या 307, 34 आणि 4/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »