
House Rent Agreement | येत्या सोमवारपासून आता भाडे करार चक्क मराठीतून
पुणे : प्रतिनिधी ऑनलाइन भाडेकरार आता राज्यभरातून कुठूनही नोंदविता येणार असून, त्यासाठी भाडेकरार २.० ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला असून, पक्षकारांची माहिती आधार क्रमांकाद्वारे थेट आधार पोर्टलवरूनच घेण्यात येणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. येत्या पंधरवड्यात ही प्रणाली सबंध राज्यभर