त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवरील बर्फाचा बनाव उघड, देवस्थान समितीने केली तक्रार

त्र्यंबकेश्वराच्या पिंडीवरील बर्फाचा बनाव उघड, देवस्थान समितीने केली तक्रार

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. महादेवाच्या पिंडीवर जमा झालेला तो बर्फ म्हणजे बनाव होता असे उघडकीस आले आहे. उल्लेखनीय म्हणजे याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. र्त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीभोवती बर्फ जमा झाल्याचे सांगत सुशांत तुंगार या पूजाऱ्याने सोशल मीडियावर २०२२ साली…

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

Bullet train निघाली सुस्साट, Godrej चा ब्रेकर निकामी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला अखेर मुंबई हायकोर्टानं ग्रीन सिग्नल दिला. या प्रकल्पामध्ये अडथळा ठरणारी गोदरेज कंपनीची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर हायकोर्टाचे न्या. रमेश धानुका आणि न्या. मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आपला निकाल देत गोजरेजची ही याचिका फेटाळली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात विक्रोळी येथील…

TotalEnergies : अदानी समूहाला फ्रान्सचा दणका !

TotalEnergies : अदानी समूहाला फ्रान्सचा दणका !

लंडन : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासमोरील अडचणीमध्ये सतत भर पडत आहे. एकीकडे अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत असतानाच कंपन्यांचे बाजारमूल्यही लक्षणीय पद्धतीने घसरणीस लागले आहे. अदानी समूहातील सर्वात मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सच्या (Total energies) टोटल एनर्जी या कंपनीने आपली भागीदारी आता स्थगित केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पोयान (patrick pouyanne)…

Railway : १० वी पास उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरी

Railway : १० वी पास उमेदवारांना रेल्वे मध्ये नोकरी

रेल्वे कोच फॅक्टरीमधील एकूण ५५० पदे या अप्रेंटिस भरतीद्वारे भरली जाणार आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rcf.indianrailways.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ आहे. वयोमर्यादा ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा १५ वर्षांपेक्षा जास्त असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत…

Bank strike : महाराष्ट्र बँकेचे दरवाजे ९, १० फेब्रुवारीला बंद राहणार

Bank strike : महाराष्ट्र बँकेचे दरवाजे ९, १० फेब्रुवारीला बंद राहणार

औरंगाबाद : नोकर भरती तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची द्विपक्षीय वाटाघाटीतून सोडवणूक करण्याच्या मुद्यावर भर देत महाराष्ट्र बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी पुन्हा ९ आणि १० फेब्रुवारी रोजी संपावर जात आहेत. यापूर्वी १६ आणि २७ जानेवारी रोजी महाबँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. आज का व्हाट्सएप स्टेटस। कृपया सभी रखे।Today's WhatsApp status pic.twitter.com/SlMkRVzc4c — Devidas Tuljapurkar…

RBI : महागाईचा विळखा आणखी घट्ट, कर्जावरील व्याज वाढले

RBI : महागाईचा विळखा आणखी घट्ट, कर्जावरील व्याज वाढले

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या पतधोरणानुसार महागाईचा विळखा आणखी घट्ट झाला असून गृह आणि वाहन कर्जावरील व्याज दरात वाढ होत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाईचा दर ५.६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ही माहिती दिली. देशातील केंद्रीय बँकेची पतधोरण बैठक सोमवार ६ फेब्रुवारी रोजी…

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

सेवा निवृत्त शिक्षक जूनमध्ये शाळेवर, १५ हजार शाळांमध्ये होणार नियुक्ती

१,५०० केंद्र प्रमुख, ३० हजार शिक्षकांची जूनमध्ये होणार नियुक्ती औरंगाबाद : महाराष्ट्रातील सेवा निवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत सामावून घेतले जात आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून सेवा निवृत्त शिक्षक शाळेवर रुजू होतील, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील १५ हजार पेक्षाही अधिक शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तथापि, जूनपासूनच ३० हजार…

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नानांच्या नेतृत्वावरून सुरु झालेले मतभेद अखेर दुफळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी प्रकरणाच्या निमित्ताने सारी खदखद बाहेर येत आहे. मुळात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद होत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे. तरीही काँग्रेस श्रेष्ठी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस संपुष्टात आणण्याचे फारसे प्रयत्न करतील…

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

नवी दिल्ली : गौतम अदानी विवाद प्रकरणावरून संसदेतील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले असताना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप…

Govt. job : वन विभागात नोकर भरती

Govt. job : वन विभागात नोकर भरती

महाराष्ट्र वन विभागात मोठी पदभरती होत आहे. या संदर्भात नवीन GR दि. २ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभागात गट क, ड, श्रेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे. यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवार, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे तसेच…