khabarbat

khabarbat logo

Join Us

NCP leader Bhagirath Bhalke join BRS party

Advertisement

भगीरथ भालके BRS मध्ये; राष्ट्रवादीला झटका

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला काढता पाय घेतला असतानाच पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के.चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केले.

दरम्यान, भगीरथ भालके म्हणाले की, तेलगंणामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना अतिशय चांगल्या आहेत. तेलंगणा सरकार शेतकरी वर्गासाठी चांगले काम करत आहे. २०१४ ला हे राज्य निर्माण झाले. आणि अवघ्या ९ वर्षांत त्यांनी राज्याचा विकास केला. महाराष्ट्रात कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, कोणत्याही पक्षाची टीम नाही, असा टोला लगावला. केसीआर यांनी आम्ही महाराष्ट्रात आल्याने इतर पक्षात भीतीचे वातावरण का? असा सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादीला मोठा धक्का

दरम्यान या राजकीय साठमारीत भगीरथ भालके यांनी गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठकांचा सपाटा लावत सर्वांना सोबत घेऊन जायची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते आज भालके यांच्या सरकोली गावात पोचले होते. अभिजित पाटील यांना शरद पवार यांनी प्रवेश दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला घरघर लागली असून भगीरथ भालके यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे .

khabarbat.com वर जाहिरात छोटी, प्रतिसाद मोठा…

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »