बीआरएसच्या महाराष्ट्रात येण्याने राजकीय पक्षात भितीचे वातावरण आहे. तेलंगणासारखा महाराष्ट्राचा विकास केल्यावर दौरे बंद करेल. बीआरएस तेलंगणा महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही. तसेच बीआरएस कोणत्या राजकीय पक्षाची टीम नाही तर शेतकऱ्यांची टीम आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आणा आम्ही विकास करु, अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंढरपूरच्या सभेत दिली.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी ६०० वाहनांच्या ताफ्यासह पंढरपूरला पोहोचले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली. दरम्यान, त्यांनी आयोजित सभेत संबोधित केले.
केसीआर यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे …
१) बीआरएसच्या महाराष्ट्रातील प्रवेशामुळे इतर पक्षात भीती आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने विकास केला नाही.
२) बीआरएस ही शेतकऱ्यांची टीम आहे, कोणत्याही राजकीय पक्षाची नाही
३) सोलापूर आणि औरंगाबादमध्ये ८ दिवसांपासून एकदा पाणी येते, मग विकास कसला झाला, बीआरएस हा तेलंगणा आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष नाही
४) महाराष्ट्रात वीज कंपन्यांचे खासगीकरण का केले, तरी देखील शेतकऱ्यांनी वीज का मिळत नाही?
५) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी विमा योजना का नाही, आम्ही शेतकऱ्यांना विमा योजना दिली. महाराष्ट्रात शेतकरी एकत्र होत नाही, तोपर्यंत काही बदलणार नाही. राजकीय पक्ष येतील आणि जातील.