US shutdown

US shutdown : निधी अभावी अमेरिकी सरकारचे काम रखडणार, पगार थांबणार

सध्या अमेरिकेत सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे Government Shutdown. अमेरिकेतील काँग्रेसने ३१ ऑक्टोबरपूर्वी सरकारचा निधी मंजूर केला नाही, तर सरकारच्या अनेक खात्यांचे काम थांबेल. गोल्डमन सॅक्सचे म्हणणे आहे की, काँग्रेसने ३० सप्टेंबरपूर्वी हा प्रस्ताव मंजूर केला नाही, तर १ ऑक्टोबरपासून सरकारचे काम ठप्प होऊ शकते. यूएस फेडरल सरकारमध्ये, काँग्रेस आर्थिक वर्षात ४३८ सरकारी यंत्रणांना निधीचे वाटप…

squash : india wins gold

squash स्पर्धा : पाकशी चुरशीच्या लढतीत भारताला सुवर्ण

चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताची घोडदौड सुरूच आहे. आज भारताच्या स्क्वाश टीमने पाकिस्तानला धूळ चारत गोल्ड मेडल मिळवले. पुरुष स्क्वाश स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. भारताने २-१ फरकाने पाकिस्तानवर मात करत सुवर्णपदकावर पटकावले. पहिल्या सामन्यात भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये पाकिस्तानने विजय मिळवत १-० अशी आघाडी…

स्वराज्य ढोल-ताशा पथकाचा स्वीडनमध्ये धमाकेदार गजर

स्वराज्य ढोल-ताशा पथकाचा स्वीडनमध्ये धमाकेदार गजर

एकीकडे पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना सात समुद्रापार महाराष्ट्रीय संस्कृती जपण्याचा यशस्वी प्रयत्न मराठीजणांनी केला. मुंबई, पुणे, नाशिकमधील ढोल-ताशा पथकाप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स स्वीडनमधील गोथेनबर्ग मध्ये पाहायला मिळाला. स्वीडनमधील नागरिकांनी या ढोल – ताशा पथकाच्या ठेक्यावर ताल धरत चांगलीच दाद दिली. स्वीडनमध्ये पहिल्यांदा मराठीजणांनी ‘स्वराज्य ढोल-ताशा पथक’ स्थापन केले….

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

सोन्याच्या जेजुरीला झळाळी, गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात

जेजुरी : विजयकुमार हरिश्चंद्रे सोन्याच्या जेजुरीतील लोकदैवत खंडोबाच्या गडकोटास सुमारे ३०० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्राची झळाळी नव्याने देण्याचे काम सुरु आहे. खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. जेजुरी गडाचे गतकालीन वैभव पुन्हा भाविकांना अनुभवता येणार आहे. गडकोटाच्या भिंती अंतर्गत दगडी कामाला सुरवातही करण्यात आली आहे. या करिता राज्य शासनाच्या पुरातत्व विभागकडून कामांना वेगही आला…

पप्पा.. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेऊ नका; मनोज जरांगे यांच्या निर्धाराला कन्येचे बळ!

पप्पा.. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेऊ नका; मनोज जरांगे यांच्या निर्धाराला कन्येचे बळ!

मुलाखत : राजेंद्र घुले   मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसापासून बेमुदत उपोषणास बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांच्यावर उपोषणस्थळीच औषधोपचार सुरू आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या निर्धारास त्यांच्या कन्येनेही बळ दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे दिनांक २९ ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत….

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

पंतप्रधानपदी मोदींनाच पसंती, मात्र BJP चे ४० टक्के उमेदवार धोक्यात

भाजप श्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन ते अडीच महिन्यात केले. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी साधारणपणे ६० टक्के जागा BJP जिंकू शकते मात्र ४० टक्के जागा धोक्यात आहेत. असा निष्कर्ष या पाहणी अहवालात नोंदविण्यात आला आहे. जनतेला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे आहेत, पण उमेदवार बदला, असा धक्कादायक निष्कर्ष…

ban on mobile

सरकारी कर्मचाऱ्यांना आता मोबाईल वापरण्यास बंदी

  चीनने सरकारी कर्मचाऱ्यांना अमेरिकी कंपनी ॲपलसह अन्य देशांतील उत्पादित मोबाईल (mobile) फोन वापरण्यास आता मनाई केली आहे. हेरगिरीच्या संशयावरून चीनच्या सरकारने पाऊल उचलले असावे, असा सांगितले जात आहे. यापुढे सरकारी कार्यालयात आयफोन आणू नयेत व कामकाजासाठी त्याचा वापर करू नये, अशी तंबी चीनी सरकारने दिली. वॉल स्ट्रीट जर्नलने या आदेशाचा दावा केला आहे. चीनने…

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

मराठा आरक्षण : अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली, उपोषण सुरूच !

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंतरवली (जि. जालना) येथे सुरु असलेले उपोषण यापुढे सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. याचाच अर्थ माजी आमदार अर्जुन खोतकर यांची शिष्टाई मनोज जरांगे यांनी धुडकावली आहे. राज्य सरकारने ७ सप्टेंबरच्या आदेशात कोणतीही दुरुस्ती केलेली नाही, आणि २००४ च्या जी.आर. मुळे आमचा काहीही फायदा झालेला नाही. त्यामुळे माझे…

The Vaccine War will be realease on 28th Sept. 2023

The Vaccine War : कोरोनाच्या विषाणूंवर तुटून पडलेल्या संशोधकांच्या संघर्षाची कहाणी !

कोरोनाच्या काळातील संघर्ष आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी ज्या जैव संशोधकांनी आपले सर्वस्व पणाला लावले, ज्या संघर्षाला तोंड दिले. त्याची नोंद फारशी घेतली गेली नाही, ते सारे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. म्हणूनच विवेक अग्निहोत्रींचा (the vaccine war) ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा सिनेमा सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत…

आता सूर्यावर स्वारी !

आता सूर्यावर स्वारी !

चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर इस्रोने पुढच्या मोहिमेची तारीख जाहीर केली आहे. मिशन आदित्य एल-१ हे येत्या २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंतराळात झेपावणार आहे. मिशन आदित्यच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास करणार आहेत. फायद्याची बातमी म्हणजे khabarbat.com