नगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान
पंढरपुरात आज (२९ जून) आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी २५ वर्षांपासून नियमित वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या (Lord Vitthal) मूर्तीला चंदनाचा लेप लावून…