EV sale goes down | इलेक्ट्रिक वाहन खरेदीला ग्राहकांचा ठेंगा
khabarbat News Network मुंबई । देशाची राजधानी दिल्लीला इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनवायचे होते. प्रदुषणामुळे वैतागलेल्या दिल्लीकरांना ईव्हीकडे वळविण्यासाठी सबसिडी आणि टॅक्स माफीची खैरात देण्यात आली. याचे अनुकरण कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही केले. आता ईव्ही वाहनांच्या विक्रीने पुरेसा वेग पकडल्याचे सांगून केंद्राने आणि नंतर राज्यांनी सबसिडी कमी करण्यास सुरुवात केली. पण हेच मुळावर आले…