khabarbat

khabarbat logo

Join Us

Austria, which has remained neutral for 70 years, is showing signs of a coup with the rise of right-wing parties. This year, elections are likely to be held in 9 European countries

Advertisement

Europe on right wing | युरोपात उजव्या विचारसरणीचा उदय; पाच वर्षांत सात देशांत सत्तेवर!

The Rise of the Right in Europe; Power in seven countries in five years!
Austria, which has remained neutral for 70 years, is showing signs of a coup with the rise of right-wing parties. This year, elections are likely to be held in 9 European countries including Austria. Austria will vote on September 29. The Czech Republic has an election in September. Bosnia, Bulgaria, Georgia, Lithuania, Moldova will hold elections in October, while Croatia and the most important of Eastern Europe, Romania, will hold elections in December.
Austria, which has remained neutral for 70 years, is showing signs of a coup with the rise of right-wing parties. This year, elections are likely to be held in 9 European countries
Austria, which has remained neutral for 70 years, is showing signs of a coup with the rise of right-wing parties. This year, elections are likely to be held in 9 European countries.

व्हिएन्ना । युरोप राष्ट्रवादाच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. गेल्या पाच वर्षांत येथे उजव्या विचारांच्या राजकीय पक्षांनी सात देशांत सत्ता मिळवली. त्या आधी मात्र युरोपातील कोणत्याही देशात उजव्या विचारांच्या पक्षांकडे सत्तेची सूत्रे नव्हती. सध्या इटली, फिनलँड, स्लोव्हाकिया, हंगेरी, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, नेदरलँड्समध्ये राष्ट्रवादी सरकार सत्तेवर दिसत आहे.

या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रियात होऊ घातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी फ्रीडम पार्टी विजयाच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. पाहणीनुसार फ्रीडम पार्टीला सुमारे २७ टक्के मते मिळू शकतात. खरे तर युरोपातील निवडक तटस्थ देशांत ऑस्ट्रियाची गणना होते. ७० वर्षांपासून तटस्थ राहिलेल्या ऑस्ट्रियात उजव्या विचारांच्या पक्षांचा उदय झाल्याने सत्तापालट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

यंदा ऑस्ट्रियासह युरोपातील ९ देशांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रियात २९ सप्टेंबरला मतदान होईल. झेक गणराज्यात सप्टेंबरमध्येच निवडणूक आहे. ऑक्टोबरमध्ये बोस्रिया, बल्गेरिया, जॉर्जिया, लिथुवेनिया, मॉल्डोवामध्ये तर क्रोएशिया आणि पूर्व युरोपातील सर्वात महत्त्वाच्या रोमानियामध्ये डिसेंबरमध्ये निवडणूक होईल.

युरोपात केवळ ब्रिटन राष्ट्रवादी पक्षांच्या आघाडीपासून दूर राहिले. परंतु जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी इंडिपेंडन्स पार्टीने (यूकेआयपी)१३ टक्के मते मिळवली. गेल्या निवडणुकीत या पक्षाला केवळ ३ टक्के मते मिळाली होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »