शेअर बाजार उसळला; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा
|

Share Market News | गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा; निवडणुकीनंतर शेअर बाजार उसळला

  मुंबई : विशेष प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून अस्थिर असणा-या शेअर बाजारात आज (सोमवारी) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयानंतर चांगलीच उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी, २ दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीनंतर, सेन्सेक्स ८०,४०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी २४,३०० च्या वर व्यवहार करत आहे. दोन्हीमध्ये १.५ टक्क्यांहून अधिक…

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है!

Maharashtra election analysis | एक है, तो सेफ है….

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हिंदू-मुस्लिम ऐक्याची प्रचिती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २०० पार मजल सहज मारली. भाजपला २५ टक्के मते मिळाली. एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल मिळेल असे संकेत होते. मात्र राज्यात विरोधी पक्षाचा नेताही होणार नाही इतका प्रचंड विजय महायुतीने मिळविला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच महिन्यांत राज्याचे चित्र पूर्णपणे बदलले. महायुतीच्या विजयात…

It is necessary to take oath on 24th November and form the cabinet by 25th in Maharashtra (India). If that does not happen, the possibility of President's rule in the state cannot be ruled out.

President’s Rule in Maharashtra; Only two days to form the government

New Delhi : Khabarbat News Network The result of Maharashtra Assembly election will be declared on 23 November 2024. As soon as the polls were over, various organizations released their exit polls. From that, it seems that Mahayuti can reach the majority in the state, but it is being claimed that Mahavikas Aghadi will give…

It is necessary to take oath on 24th November and form the cabinet by 25th in Maharashtra (India). If that does not happen, the possibility of President's rule in the state cannot be ruled out.

महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी अवघे दोन दिवस; राष्ट्रपती राजवटीची चाहूल

  नवी दिल्ली : khabarbat News Network महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहे. राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी काट्याची टक्कर देईल असा दावा करण्यात येत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बारगळणार आहे. पण जर काँटे की टक्कर झाली आणि…

तिरुपती बालाजीचे आता 2 तासात दर्शन; मंदिरातील रांगेचे टेन्शन संपले

तिरुपती बालाजीचे आता 2 तासात दर्शन; मंदिरातील रांगेचे टेन्शन संपले

  Tirumala : khabarbat News Network आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाने (AI) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन दर्शन व्यवस्था बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत नवीन व्यवस्थेअंतर्गत भाविकांना अवघ्या 2 तासांत व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. सध्या, तिरुपती…

पवनकल्याणच्या एन्ट्रीने लातूरच्या तरूणाईत चैतन्य….

पवनकल्याणच्या एन्ट्रीने लातूरच्या तरूणाईत चैतन्य….

लातूर : आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक गाजवलेले जनसेना पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या ‘रोड शो’ला लातूर येथील तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देशमुखांचा गड मानल्या जाणा-या लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढत असलेल्या अर्चना चाकूरकर यांच्या प्रचारार्थ पवनकल्याण यांनी झंझावाती सभा घेतली. एकीकडे अमित देशमुखांसाठी रितेश…

Navneet Rana narrowly escaped with the help of security guards. His security guard was slightly injured in the attack at Daryapur (Dist. Amravati)

नवनीत राणांच्या सभेत राडा…

अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदार संघातील खल्लार येथे युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे शनिवारी (दि.१६) आयोजन करण्यात आले. यावेळी सभेत जमलेल्या काही विरोधकांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली आणि नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला. दरम्यान, गोंधळ थांबत…

sharad pawar

शिवसेना-भाजप युती तोडण्याचे कारस्थान माझेच… शरद पवारांची १० वर्षानंतर कबुली!

  मुंबई : विशेष प्रतिनिधी भाजपला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपपासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. २०१४ साली भाजपला पाठिंबा देण्याच्या विषयावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची कबुली दिली. २०१४ साली भाजपने न मागता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला…

 Kirit Somaiya alleged that more than 125 crores of money was used for vote jihad. Raid of ED is related to Siraj Ahmed who was arrested from Nashik.

 Vote Jihad | ‘व्होट जिहाद’साठी मालेगावात हवालामार्फत १२५ कोटी?

मालेगावात दोघांना अटक, ‘ईडी’चे २३ ठिकाणी छापे मुंबई : khabarbat News Network महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना ‘ईडी’कडून छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण २३ ठिकाणी छापे मारण्यात आले. व्होट जिहाद प्रकरणाशी या छापेमारीचा संबंध असल्याचे म्हटले जात असून पोलीस दल अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नॅशनल मर्कंटाइल बँकेशी संबंधित प्रकरणात ही छापेमारी…

vinod tawde

Latest News | भाजपचा सर्व्हे रिपोर्ट काय सांगतो? महायुतीला किती जागा?

  मुंबई : khabarbat News Network भारतीय जनता पक्षाने संभाव्य निवडणूक निकालाविषयी (BJP survey) सर्व्हे करवून घेतला. त्यानुसार महायुतीला राज्यात १६५ जागा मिळतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. (Marathi News) या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप ९५ ते ११० जागा जिंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला…