khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

सावधान! Bleeding Eye चा वाढतोय कहर…

News Network

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनंतर आता एक नवा व्हायरस जगभर कहर करण्याच्या तयारीत आहे. आफ्रिकेतील रवांडा येथे मारबर्ग म्हणजे ब्लीडिंग आय दिसून येत आहे, जो अत्यंत धोकादायक आहे. याचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मारबर्ग व्हायरसला Bleeding Eye असंही म्हणतात. हा व्हायरस इबोला (Ebola)व्हायरस कुटुंबातील आहे आणि रवांडामध्ये वेगाने पसरत आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, याचा मृत्यूदर ८८ टक्के आहे. लक्षणं गंभीर असल्यास आठ ते नऊ दिवसांत रुग्णांचा मृत्यू होतो. परंतू जर याबाबत आधीच माहिती मिळाली तर लवकर उपचार केले जाऊ शकतात.

Save Swiftlet | वेंगुर्ल्याजवळील ‘पाकोळ्या’चा सर्वांत मोठा अधिवास नष्ट होण्याची चिन्हे!

Bleeding Eye व्हायरसचं सायंटिफीक नाव हेमोरेजिक काँजंक्टिव्हायटीस आहे. हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्यामुळे डोळ्यांतून रक्तस्त्राव होण्याची लक्षणं दिसू शकतात. या समस्येदरम्यान डोळ्यांच्या पांढ-या भागात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. हा व्हायरस वेगाने पसरतो.

वटवाघळांपासून होतो प्रसार

डॉक्टरांच्या मते, हा व्हायरस झुनोटिक (Zunotic Virus) आहे, म्हणजेच तो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. हे विशेषत: वटवाघळांपासून आलेला आहे आणि वटवाघळांची लाळ, रक्त याच्या संपर्काद्वारे माणसांमध्ये पसरतो.

हे पण वाचा : १ जानेवारीपासून कारच्या किमती वाढणार!

Bleeding Eye ची लक्षणे

डोळ्यांची जळजळ आणि खाज येणे, डोळ्याच्या पांढ-या भागात लालसरपणा किंवा रक्ताची गुठळी, सौम्य ताप, स्रायू दुखणे, अतिसार, तीव्र डोकेदुखी, पोटदुखी, नाक आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव, अंधुक दिसणे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »