मालवण : विशेष प्रतिनिधी
एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) द्वीप समूहातील बर्न आयलँड बेटावरील गुहेत असलेल्या भारतीय पाकोळी (इंडियन स्विफ्टलेट) या पक्ष्याची जगातील सर्वांत मोठी वीण वसाहत नष्ट होणार असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. या वसाहतीचे संवर्धन करण्यासाठी ‘सॅकॉन’चे शास्त्रज्ञ पुढे सरसावले आहेत. शास्त्रज्ञांनी याबाबत संवर्धन आराखडा तयार केला असून असून हा आराखडा भारत सरकारला सादर करण्यात आला आहे.


Scientists fear that the world’s largest breeding colony of the Indian swiftlet, located in a cave on Burn Island in the Vengurla (Sindhudurg) archipelago, will be destroyed by the end of the 21st century. Scientists from SACON have stepped forward to conserve this colony.
‘सॅकॉन’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिरीष मंची, डॉ. गोल्डिन क्वॉरडोज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक धनुषा कावलकर या एका प्रकल्पाअंतर्गत २०२० पासून महाराष्ट्रातील पाकोळी पक्ष्यांच्या वसाहतींचे संशोधन करीत आहेत. भारतीय पाकोळी एकपत्नीव्रत असतात. त्यांचे पाय कमजोर असल्याने त्यांना ‘एपोडेडी’ म्हणतात. ते कधीही जमिनीवर उतरत नाहीत.

वेंगुर्ला (नीवती बेट, जि. सिंधुदुर्ग) रॉक्स हा पृथ्वीवरील सर्वात जुन्या खडकांचा द्वीपसमूह आहे. या बेटांवर असलेल्या भारतीय पाकोळी पक्षाच्या वसाहतीला वातावरण बदलाचा धोका उद्भवला आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या आराखड्यात शासनाला काही निर्देश दिले आहेत. जगातील सर्वात समृद्ध असलेली वेंगुर्ला रॉक्स सागरी बेटावरील भारतीय पाकोळ्यांची वसाहत वाचवायची असेल तर हि बेटे संरक्षित क्षेत्र घोषित करणे गरजेचे आहे. शासनाच्या वन, महसूल, कृषी, पर्यावरण आदी विभागांना सुध्दा यात सहभागी व्हावे लागणार असल्याचे धनुषा कावलकर म्हणाल्या.
जगातील सर्वात मोठी वसाहत
जगात भारतीय पाकोळींच्या १३ वसाहती आहेत. या पैकी भारतात ७ वसाहती असून वेंगुर्ला (नीवती, जि. सिंधुदुर्ग) रॉक्स बेटांवरील पाकोळी पक्षांची वसाहती जगातील सर्वात मोठी वसाहत आल्याचे समोर आले. येथील २३ बेटांपैकी बर्न आयलँड या बेटावर ६१ मी. लांब आणि १८ मी. उंच असलेल्या सागरी गुहेत ही वसाहत आहे.