khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Deepfake : ऑनलाईन दरोड्याचे अनोखे मायाजाल!

विश्लेषण/श्रीपाद सबनीस

जगभरात अनादी काळापासून वाटमारी, लुटमारी, दरोडेखोरीचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. आपल्या सभोवताल देखील काही प्रमाणात त्याची प्रचिती येत असते. मात्र जसजसे तंत्रज्ञान प्रगत होत गेले तसे दिवसेंदिवस अनेकविध नव-नवे प्रयोग दृष्टीक्षेपात येत आहेत. आजवर मेसेजिंग अ‍ॅप किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांचे खिसे कापले जायचे. आता त्यात (Deepfake)डीपफेकची भर पडली आहे.

अलिकडेच जगभर डीपफेक तंत्रज्ञानाची चर्चा सुरू असतानाच हॉँगकॉँगमधील एका मल्टी नॅशनल कंपनीला फक्त एका व्यक्तीने याच तंत्रज्ञानाचा वापर करून चक्क (२५.६ मिलियन डॉलर्स) २०० कोटी रूपयांचा चुना लावण्यात आल्याची बातमी येऊन थडकली.

Deepfake techonology चे दृश्य रूप…

या ऑनलाईन दरोड्याच्या अनुषंगाने डीपफेक तंत्रज्ञानाविषयी माहिती देताना हॉँगकॉँग पोलिसांनी जी माहिती दिली त्यावरून त्याचे दृश्य रूप आणि परिणाम लक्षात येतात. थोडक्यात सांगायचे तर या प्रकरणात दिसलेला अधिकारी खोटा होता, त्याच्या सभोवताल वावरणारे किंबहुना असलेले अन्य कर्मचारी देखील खोटे होते तरी ते दिसायला सगळे खरे-खुरे असल्यासारखेच होते. एकंदरीत हे सारे दृश्य आभासी असूनही बेमालूम खरे वाटत होते. कोणालाही त्याविषयी संशयास्पद वाटले नाही, हीच या तंत्रज्ञानाची खासियत म्हणावी.

हुबेहूब मायाजाल….

या प्रकरणातील स्कॅमरने व्हिडिओ कॉलद्वारे कंपनीतील कर्मचा-यांना पैसे ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. हा स्कॅमर कंपनीच्या ख-या खु-या मुख्य आर्थिक अधिका-याच्या ( CFO) च्या रुपात दिसत होता. तो केवळ दिसायलाच ख-या अधिका-याप्रमाणे नव्हता, तर त्याचा आवाजही अगदी सारखाच होता अशी माहिती कंपनीच्या इतर कर्मचारी आणि अधिका-यांनी दिली.

डीपफेकचा अशा बेमालूम प्रकारे वापर करण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी एका व्यक्तीला दुस-या व्यक्तीने डीपफेक व्हिडिओच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार समोर आले. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एका संपूर्ण ऑफिसलाच गंडवल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.

Advertise with us

या स्कॅमचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ फायनान्स ऑफिसरच नव्हे, तर व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारे इतर काही अधिकारी देखील डीपफेकच्या मदतीने तयार केलेले होते. या सर्वांनी कंपनीतील ख-या अधिका-यांना एकूण १५ ट्रान्झॅक्शन करण्याचे आदेश दिले. ही एकूण रक्कम सुमारे २०० कोटी रुपये होती. हाँगकाँगमधील सहा वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये ही रक्कम पाठवण्यात आली.

पब्लिक प्लॅटफॉर्मचा केला वापर

अधिका-यांचे डीपफेक रुप तयार करण्यासाठी हॅकर्सनी या अधिका-यांच्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणा-या माहितीचा वापर केला. त्यांचे व्हिडिओ, फोटो अशा गोष्टींचा वापर करून ते अधिकारी बोलताना त्यांचा आवाज कसा येतो, त्यांचे हावभाव कसे असतात या सगळ्याची माहिती हॅकर्सने सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून मिळवली होती.

फसवा व्हिडीओ खरा वाटला…

या कंपनीचे नाव हाँगकाँग पोलिसांनी उघड केलेले नाही. ही मल्टिनॅशनल कंपनी आहे, कंपनीचे सीएफओ यूकेमध्ये होते. यावेळी त्यांच्या नावाने एक ई-मेल कंपनीमध्ये आला होता. हा मेल खोटा असल्याचा संशय एका कर्मचा-याला आला, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्यानंतर स्कॅमरने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मदत घेतली. यामध्ये CFO सह कित्येक ओळखीचे चेहरे दिसू लागल्यामुळे कर्मचा-यांची खात्री पटली की हा व्हिडिओ कॉल खरा आहे, आणि नंतर त्यांनी रक्कम ट्रान्स्फर केली.

सजग राहा, सतर्क राहा…

एकंदरीत आपण कल्पना करू शकणार नाही, इतक्या अनेकविध प्रकारांनी तंत्रज्ञान वेगाने आपल्या समोर येत आहे. त्याचे चांगले आणि वाईट दोनही प्रकार अनुभवास येत आहेत. तथापि, एक मात्र खरे की, प्रत्येकाने अधिकाधिक सजग आणि सतर्क राहणे हे भविष्यात महत्वाचे आहे, आणि त्यास पर्याय नाही!

नोकरी पाहिजे… तर वाचत राहा khabarbat.com

 सबस्क्राईब करा, बेल बटनवर क्लिक करा…

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »