khabarbat

khabarbat logo

Join Us

ambejogai (Beed) murder

Advertisement

जमिनीचा वाद भडकला, मामाने भाच्याचा जीव घेतला !

 

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात झाली. काठीने बेदम मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा खून केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये मारेकरी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मृत तरुणाचे मामा आहेत.

राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७) असे मृत तरुणाचे नाव आहे. राम माणिकराव लाड, लक्ष्मण माणिकराव लाड, भारत माणिकराव लाड, बजरंग माणिकराव लाड, शत्रुघ्न माणिकराव लाड अशी आरोपींची नावे आहेत.

ambejogai (Beed) murder

राजेंद्र कळसे हा अंबाजोगाई शहरातील पाटबंधारे विभागाच्या मांजरा कॉलनीमध्ये राहत होता. राजेंद्र कळसे आणि त्यांचे पाच मामा यांच्यामध्ये जागेवरून ब-याच दिवसांपासून वाद सुरू होता. याच जागेवरून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. याचाच राग मनात धरून पाचही मामांनी राजेंद्र कळसे हा मोंढा परिसरात उभा असताना, त्याला काठ्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेला राजेंद्र जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा : 99605 42605

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »