चांद्रयान मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर इस्रोने पुढच्या मोहिमेची तारीख जाहीर केली आहे. मिशन आदित्य एल-१ हे येत्या २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास अंतराळात झेपावणार आहे. मिशन आदित्यच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञ सूर्याचा अभ्यास करणार आहेत.