khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

नववीत शिकणाऱ्या मुलीवर ६ महिने‎ अत्याचार; दोघांना कोठडी

कन्नड‎ kannad तालुक्यातील नववीत‎ शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या‎ सहा महिन्यांपासून दोन नराधम सतत‎ लैंगिक अत्याचार करत असल्याची‎ संतापजनक घटना समोर आली.‎ याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून‎ कन्नड शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध‎ (२६ जून) रोजी गुन्हा दाखल‎ केला आहे.

रामेश्वर कवडे आणि मोहन‎ शिंदे अशी आरोपींची नावे असून‎ दोघांनाही पोलिसांनी अटक केली.‎ त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता‎ ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली‎.‎ कन्नड kannad शहराजवळील एका गावात एक‎ अल्पवयीन मुलगी घरी एकटी राहत‎ असताना रामेश्वर कवडे याने‎ तिच्यावर अत्याचार केला.‎ याबाबत कोणाला सांगितल्यास तुझी‎ बदनामी करेल, तुझे लग्न होऊ देणार‎ नाही, अशी धमकी देत‎ आरोपीने वारंवार बलात्कार केला.

ही बाब‎ दुसऱ्या आरोपी मोहन शिंदे याच्या‎ निदर्शनास आली. त्यानेही पीडितेला‎ आपल्यासोबत शरीर सबंध ठेव नाहीतर‎ तुझ्या आई-वडिलांना सांगतो असे म्हणत‎ त्या अल्पवयीन मुलीवर‎ अत्याचार केला. हे दोघे धमकी देऊन‎ वारंवार अत्याचार करत असल्याने चार‎ दिवसांपूर्वी पीडितेने आई-वडिलांनाही‎ याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी‎ कन्नड शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद‎ दिल्यावर पोलिसांना तत्काळ या‎ नराधमांना अटक केली. याप्रकरणी kannad पिंक पथकाचे पोलिस‎ उपनिरीक्षक राम बारहाते तपास करत आहेत.‎

आपल्या गावची बातमी, वाचा : khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like