khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

LIC चे ५० हजार कोटी रुपये पाण्यात… कसे ते पहा !

 

औरंगाबाद : हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर २४ जानेवारी २०२३ रोजी Accounting fraud आणि Stock manipulation सह गंभीर आरोप केले. यानंतर अदानी समूहाच्या १० सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सला मोठा फटका बसला.

LIC म्हणजेच भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या देशांतर्गत सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली. या गुंतवणुकीमुळे LIC ला ४९,७२८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

वर्षभराच्या अर्थात YTD च्या आधारावर, अदानी टोटल गॅसचे शेअर्स गुरुवारपर्यंत सर्वाधिक ७८.५० टक्क्यांनी घसरले.

त्यापाठोपाठ अदानी ग्रीन एनर्जी ७३.५० टक्क्यांनी घसरले, अदानी ट्रान्समिशन ७१.१० टक्क्यांनी, अदानी एंटरप्रायझेस ६४.१० %, अदानी पॉवर ४८.४० टक्क्यांनी घसरले आणि NDTV म्हणजेच नवी दिल्ली टेलिव्हिजनचे शेअर्स ४१.८० टक्क्यांनी घसरले.

(LIC ची अदानी समूहातील गुंतवणूक पाण्यात कशी गेली ते स्पष्ट करण्याची विनंती khabarbat.com च्या Users कडून करण्यात आली होती. त्याअनुषंगाने हा तपशील येथे दिला आहे. अनेकांनी LIC ची गुंतवणूक सुरक्षित असल्याचाही दावा केला होता. आज वस्तुस्थिती सर्वांच्या समोर आहे. तालिका सौजन्य : Business Today)

LIC म्हणजेच भारतीय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या देशांतर्गत सर्वात मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणुक केली. या गुंतवणुकीमुळे LIC ला ४९,७२८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एलआयसीच्या गुंतवणुकीचे एकत्रित बाजार मूल्य २३ फेब्रुवारी रोजी ८२,९७० कोटी रुपये होते. ते आता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ३३,२४२ कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अदानी शेअर्सचे बाजार मूल्य आणि त्यांचे सध्याचे बाजार मूल्य यांच्यातील फरकावर हा तपशील आधारित आहे. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत LIC ची एकूण Equity asset under management (AUM) रु. १०.९१ लाख कोटी होती.

हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून एका महिन्यात गौतम अदानी यांच्या संपत्तीवर परिणाम झाला. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात त्यांची २९ व्या स्थानावर घसरण झाली आहे.

हिंडेनबर्ग संशोधन अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून, अदानी यांच्या संपत्तीत सुमारे ७५ अब्ज डॉलरची घट झाली. या वर्षी त्यांची संपत्ती सुमारे ७७.९ अब्ज डॉलरने घटली आहे.

तुमच्या उपयोगाची बातमी- khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »