khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Quake : तुर्कीमधील भूकंपाने जग हादरले, २० हजार लोक दगावले

इस्तंबूल : तुर्कीमधील भूकंपात ४००० पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मृतांचा आकडा २०,००० हून अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. या वर्षारंभातील ही सर्वात मोठी भीषण आपत्ती मानली जात आहे.

एकामागून एक तीन असे ७ रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याने मोठी हानी झाली आहे. दरम्यान, या भूकंपातील पीडितांना मदत घेऊन भारताच्या हवाई दलाचे विमान तुर्कस्तानात पोहोचले आहे.

काळजाचा थरकाप उडवणारे भूकंपातील video ….

भारताची मदत

या भूकंपाचे केंद्र तुर्कीमध्ये असले तरी त्याची झळ शेजारच्या सिरीयाला देखील बसली. तुर्कीमधील गाझियनटेप इथे सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे ४.१७ मिनिटांनी पहिला ७.८ रिश्टर स्केलचा भूंकप झाला. त्यानंतर कहरामनमारस प्रांतातील एलबिस्टन येथे ७.५ रिश्टर स्केलचा दुसरा झटका तर तिसरा ६ रिश्टर स्केलचा भूकंपही काही वेळाच्या अंतराने झाला. भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात दिला असून मृतदेहांचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षित श्वानांसह खाण्यापिण्याच्या वस्तूंसह औषधांची मदत पाठवली आहे.

सध्या तुर्की आणि सिरियात थंडीची लाट सुरु आहे, त्यातच भूकंपामुळे बेघर झालेले लोक सध्या निवाऱ्याशिवाय राहत आहेत.

या भीषण भूकंपामध्ये तुर्की आणि सिरिया या दोन्ही देशांतील हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्याचे शेकडो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रस्तेही उद्ध्वस्त झाले असून मोठा हाहाकार सध्या या दोन्ही देशामध्ये माजला आहे.

तुमच्या उपयोगाची बातमी, khabarbat.com येथे क्लिक करा.
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »