दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

दुफळीच्या डोहात काँग्रेसची डुबकी

विश्लेषण / श्रीपाद सबनीस महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले नानांच्या नेतृत्वावरून सुरु झालेले मतभेद अखेर दुफळीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले. आता सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी प्रकरणाच्या निमित्ताने सारी खदखद बाहेर येत आहे. मुळात काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये दिलखुलास संवाद होत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे. तरीही काँग्रेस श्रेष्ठी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस संपुष्टात आणण्याचे फारसे प्रयत्न करतील…

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

नवी दिल्ली : गौतम अदानी विवाद प्रकरणावरून संसदेतील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले असताना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप…

Govt. job : वन विभागात नोकर भरती

Govt. job : वन विभागात नोकर भरती

महाराष्ट्र वन विभागात मोठी पदभरती होत आहे. या संदर्भात नवीन GR दि. २ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभागात गट क, ड, श्रेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे. यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवार, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे तसेच…

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

टिळकांची नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर… काँग्रेसमधली धुसफूस थांबणार का ? पुणे : काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत बंडाळी माजण्याचे संकेत पुरंदरमधील अजित पवार समर्थकांनी दिलेच होते. मात्र या संकेताचे पडसाद नेमके केव्हा उमटणार हे गुलदस्त्यात होते. अखेर पुण्यातील कसबा आणि चिंचवड मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचे बिगुल फुंकले गेले. आता याचे…

Quake : तुर्कीमधील भूकंपाने जग हादरले, २० हजार लोक दगावले

Quake : तुर्कीमधील भूकंपाने जग हादरले, २० हजार लोक दगावले

इस्तंबूल : तुर्कीमधील भूकंपात ४००० पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मृतांचा आकडा २०,००० हून अधिक असण्याची शक्यता वर्तवली आहे. या वर्षारंभातील ही सर्वात मोठी भीषण आपत्ती मानली जात आहे. एकामागून एक तीन असे ७ रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसल्याने मोठी हानी झाली आहे. दरम्यान, या भूकंपातील पीडितांना…