khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Pune : महाविकास आघाडीत बंडाळी, NCP चे नगरसेवक BJP च्या वाटेवर !

टिळकांची नाराजी कोणाच्या पथ्थ्यावर…
काँग्रेसमधली धुसफूस थांबणार का ?

पुणे : काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत बंडाळी माजण्याचे संकेत पुरंदरमधील अजित पवार समर्थकांनी दिलेच होते. मात्र या संकेताचे पडसाद नेमके केव्हा उमटणार हे गुलदस्त्यात होते. अखेर पुण्यातील कसबा आणि चिंचवड मध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने बंडाचे बिगुल फुंकले गेले. आता याचे पडसाद लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिक विस्ताराने दिसून येणार हे देखील एव्हाना स्पष्ट झाले आहे.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. कसब्यातून भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तथापि, कसब्यातून शैलेश टिळक यांना BJP ने डावलले आहे, त्यांच्या समर्थकांची नाराजी कोणाला भोवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे NCP चे उमेदवार म्हणून नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मात्र, याच पोटनिवडणुकीच्यावेळी भाजपच्या नेत्याकडून एक महाविकास आघाडीचे टेन्शन वाढविणारा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.

यासंबधी माहिती देताना जगदीश मुळीक यांनी महाविकास आघाडीमधील १९ नगरसेवक भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, असा दावा केला. यामुळे पुण्यात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता आहे. कारण, आता महाविकास आघाडीच्या हाती काही नाही याची जाणीव नगरसेवकांना झाली आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज लागणार आहे.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, धंगेकर यांच्या उमेदवारीवरुन पक्षातील अंतर्गत धूसफूस बाहेर आली आहे. यामुळे काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Congress चे बाळासाहेब दाभेकर ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यातच काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी मंत्री रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अविनाश बागवे दोघे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. पोटनिवडणुकीपूर्वी काँग्रेसपुढे बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

तुमच्या उपयोगाची बातमी, वाचा khabarbat.com

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »