khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Goutam Adani : संसदेत विरोधी पक्षांमध्ये फूट, फायटर ममता दीदी ‘चिल्ड’ !

Parliament adjourned on the Adani issue

नवी दिल्ली : गौतम अदानी विवाद प्रकरणावरून संसदेतील विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले असताना ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे.

हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांबाबत सादर केलेल्या अहवालामुळे उद्योगजगतात आणि शेअर बाजारामध्ये खळबळ उडाली. दरम्यान, अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप करत विरोधी पक्षही आक्रमक झाले आहेत. अदानी प्रकरणावरून संसदेत जोरदार गदारोळ होत आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाळलेल्या मौनाविषयी काँग्रेसने सवाल उपस्थित केले. ममता बॅनर्जी यांना या प्रकरणात गप्प राहण्यास सांगण्यात आले, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मला वाटते ममता बॅनर्जी आणि अदानी यांच्यात चांगले संबंध आहेत. बंगालमधील ताजपूर येथे एक बंदर बांधले जात आहे. त्यामुळे मोदींविरोधात त्या फार काही बोलत नाहीत. बंगालमध्ये आम्ही त्यांना फायटर म्हणून ओळखत होतो. मात्र आता त्या शांत झाल्या आहेत.

गौतम अदानी हे ताजपूर येथे बंदर बांधत आहेत. याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्याही झाल्या आहेत. ममता बॅनर्जींनी अदानी समुहाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अदानी यांच्या हितसंबंधांना बाधा येईल, असे ममता बॅनर्जी काहीही करणार नाहीत, असा दावाही अधीर रंजन चौधरी यांनी केला.

काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष अदानी प्रकरणी चौकशीसाठी आक्रमक झालेले आहेत. त्यांच्याकडून संसदेच्या कामकाजामध्ये अडथळे आणले जात आहेत. मात्र या प्रकरणात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती वेगळी दिसत आहे. तृणमूल काँग्रेस विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेला नाही. मात्र तृणमूल काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, तसेच या आंदोलनात सहभाग घेतला होता.

तुमच्या उपयोगाची बातमी, क्लिक करा khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like