khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

शिक्षक बनला Dog walker, कोटीची कमाई

वॉशिंग्टन : अमेरिकेतील एक शिक्षक मायकेल जोसेफ याला चांगली शिक्षकाची नोकरी होती; मात्र तिथे त्याचे मन रमले नाही. त्याने या नोकरीला रामराम ठोकला आणि चक्क कुत्र्यांना फिरवण्याचे काम सुरु केले. सुरुवातीला लोकांनी वेड्यात काढले; मात्र याच बिझनेस आयडीयामुळे तो कोट्यधीश बनला.

२०१९ मध्ये मायकलने पार्ट टाईम डॉग वॉकर म्हणून काम केले. तो जेव्हा कुत्र्यांना उद्यानात फिरायला घेऊन जायचा तेव्हा तिथे येणारे इतर लोक नेहमी म्हणायचे की कुत्रे प्रत्येक गोष्टीत मायकेलची आज्ञा पाळतात. दरम्यान, एका व्यक्तीने त्याला गमतीने विचारले की, तू कुत्र्यांना फिरवण्याचे काम का नाही करत? यानंतर मायकलला ‘डॉग वॉकर’ बिजनेसची कल्पना सुचली आणि शिक्षकाची नोकरी सोडून ‘डॉग वॉकर’ बनला.

मायकल जेव्हा शिक्षकाची नोकरी करत होता तेव्हा त्यांची वार्षिक कमाई होती केवळ ३० लाख रुपये. मात्र, शिक्षकाची नोकरी सोडून त्याने सुरू केलेल्या या नवीन व्यवसायातून तो वर्षाला एक कोटीची कमाई करत आहे.

जेव्हा एकट्याला हा व्याप सांभाळणे कठीण आहे असे दिसले तेव्हा मायकलने पार्कसाइड पप्स नावाची कंपनी सुरू केली. यातून त्याने लोकांची पाळीव कुत्री फिरवायला सुरुवात केली. अमेरिकेत बहुतांश लोक कुत्रे पाळतात. मात्र, वेळेअभावी त्यांना या कुत्र्यांना घराबाहेर फिरवणे जमत नाही. अशा लोकांच्या कुत्र्यांना मायकल फिरवून आणतो. मायकलची कंपनी कुत्र्यांना फिरवण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंगही देते. डॉग वॉकिंगसाठी दर तासाला त्याची कंपनी २००० ते २५०० रुपये शुल्क आकारते. कुत्र्यांना ट्रेनिंग देण्याचा दर प्रतितास ५ हजार रुपये आहे.

तुमच्यासाठी उपयोगाची महत्वाची बातमी वाचत रहा khabarbat.com
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »