अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलीतील २२ आरोपांना निर्दोष मुक्त करण्यात आले. गुजरातमधील पंचमहल न्यायालयाने हा निर्णय दिला. या दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांचा मृत्यू झाला होता.
सबळ पुरावे नसल्याचे कारण देत २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदारांच्या मते पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह जाळण्यात आले होते.
२७ फेब्रुवारी २००२ रोजी, पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा शहराजवळ जमावाने साबरमती एक्स्प्रेसची एक बोगी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या विविध भागात जातीय दंगली उसळल्या होत्या. साबरमती एक्स्प्रेसच्या बोगीत ५९ प्रवासी मरण पावले होते, त्यापैकी बहुतांश अयोध्येहून परतणारे ‘कारसेवक’ होते.
बचाव पक्षाचे वकील गोपालसिंह सोलंकी म्हणाले, “अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांच्या न्यायालयाने मंगळवारी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली, त्यापैकी आठ जणांचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील हालोल गावात दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांची दंगल करून हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.”
अशा महत्वाच्या बातमीसाठी वाचा khabarbat.com आणि राहा Update. या बातमीविषयी आपले मत खालील Comment Box मध्ये लिहा.