khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Elon Musk : इलॉन मस्कने केला, संपत्ती गमावण्याचा विश्व विक्रम

टेक्सास : ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स्पो’चे प्रमुख इलॉन मस्क यांचे नाव Guinness book of world record मध्ये नोंदवले गेले आहे. उल्लेखनीय म्हणजे हा विक्रम नकोशा गोष्टीमुळे नोंदवला गेला. गेल्या काही दिवसांपासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने घसरण होत आहे. ट्विटरशी केलेल्या करारानंतर अनेक गोष्टींवरून मस्क यांना ट्रोलही करण्यात आले. मस्कच्या नावे वैयक्तिक सर्वाधिक संपत्ती गमावण्याचा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंदवला गेला आहे. मस्क यांचा वैयक्तिकरित्या सर्वाधिक नुकसान सहन करण्याचा हा विश्वविक्रम ठरला.

 

इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. गेल्या वर्षी ट्विटर खरेदीचा करार केल्यापासून मस्कच्या एकूण संपत्तीत सातत्याने घट झाली. फोर्ब्सच्या अंदाजाचा हवाला घेता मस्क यांनी नोव्हेंबर २०२१ पासून सुमारे १८२ बिलियन डॉलर गमावले आहेत. परंतु इतर स्त्रोतांनी हा आकडा २०० बिलियन डॉलरच्या जवळ असल्याचे म्हटले आहे.

इलॉन मस्कच्या नुकसानीचा अचूक आकडा निश्चित करणे जवळजवळ अशक्य आहे, परंतु मस्कच्या एकूण तोट्याने २००० मध्ये जपानी टेक गुंतवणूकदार मासायोशी सोनच्या ५८.६ बिलियन डॉलरच्या नुकसानीच्या यापूर्वीच्या रेकॉर्डला मागे टाकले आहे, असे जीडब्ल्यूआरच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये एलन मस्कची एकूण संपत्ती ३२० अब्ज डॉलरवरून ६ जानेवारी २०२३ पर्यंत १३७ बिलियन डॉलरवर घसरली, यामध्ये मुख्यत्वे टेस्लाच्या स्टॉकची खराब कामगिरी कारणीभूत ठरली.

 

दरम्यान, मस्कने गेल्या वर्षभरात सुमारे २०० अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली असून एखाद्या व्यक्तीने इतके मोठे नुकसान सहन करण्याचीही ही पहिलीच वेळ असावी. एकूण संपत्तीत घट झाल्याने एलन मस्कने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा दर्जाही गमावला.

तुमच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या बातम्यांसाठी वाचत राहा khabarbat.com फायदे का वायदा !
तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »