khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Yogi : आदित्यनाथ आले, ५ लाख कोटी घेऊन गेले !

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आणि एका बैठकीत थोडेथोडके नव्हे तर चक्क ५ लाख कोटीचे घबाड महाराष्ट्राच्या खिशातून घेऊन गेले. एकंदरीत आता महाराष्ट्रात फक्त विकासाच्या कोरड्या गप्पा झोडल्या जाणार आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात पाठोपाठ आता उत्तर प्रदेशच्या विकासाला बळ मिळणार हे उघड झाले आहे. महाराष्ट्राच्या पाण्यावर कर्नाटक, आंध्रची शेती बहरते. गुजरातमध्ये उद्योगाचा मळा फुलतो आता महाराष्ट्राच्याच डबोल्यावर उत्तर प्रदेशात सोन्याचा धूर निघणार हे निश्चित आहे. राजकीय अनास्था, मराठी तरुणाईचा दांभिकपणा, बेपर्वाई यामुळे बेरोजगारी आणखी वाढणार हे अधोरेखित झाले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील आघाडीचे उद्योग समुह रिलायन्स, अदानी, टाटा, पिरामल यांनी उत्तर प्रदेशात गुंतवणूकीची तयारी दर्शवली आहे. उत्तर प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये उद्योजकांना सहभागी होण्याचे आमंत्रण योगी आदित्यनाथ यांनी दिले असून त्या ठिकाणी काही करार होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला. यामध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशात ५- जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने उत्तर प्रदेशातील गावांमध्ये आरोग्य सेवा प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे. अदानी समूह सार्वजनिक-खासगी मॉडेलवर वैद्यकीय कॉलेज सह नोएडामध्ये १० हजार युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रही स्थापन करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स, टाटा सन्स, अदानी, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आणि रामकी यांच्यासह दोन डझनहून अधिक उद्योगपतींनी या दौ-यात योगी आदित्यनाथ यांच्याशी वाटाघाटी केल्या.

अदानी समूह करणार गुंतवणूक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान, अदानी समूहाचे करण अदानी यांनी वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील गुंतवणुकीच्या कृती आराखड्यावर चर्चा केली. पुढील पाच वर्षांत लाखो कोटींच्या गुंतवणुकीच्या अनेक प्रस्तावांसह ७ वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट कारखाने सुरू करण्याबाबत चर्चा केली. करण अदानी यांनी बलिया आणि श्रावस्तीमध्ये पीपीपी पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव दिला.

बिर्ला समूह उभारणार कन्व्हेन्शन सेंटर
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी नोएडा येथे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी सरकारचे सहकार्य मागितले. अन्न प्रक्रिया, डेटा सेंटर्स, वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक तसेच सौर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी चर्चा केली.

टाटा समूहाची विमानसेवा, हॉटेल्स
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर चर्चा केली. ते म्हणाले, एअर इंडियाची विमानसेवा लवकरच उत्तर प्रदेशातील सर्व विमानतळांवर उपलब्ध होईल. आध्यात्मिक महत्त्व असलेल्या सर्व ठिकाणी हॉटेल्स उभारले जातील. टाटा ऊर्जा, हायड्रोजन, ईव्ही, अन्न प्रक्रिया आणि सेमीकंडक्टरमध्ये मोठ्या गुंतवणूक योजनांवर काम करत असून उत्तर प्रदेशसोबत काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पिरामल, हिरानंदानीची विशेष मोहीम
पिरामल एंटरप्रायझेसचे अजय पिरामल म्हणाले, कंपनी सामाजिक जबाबदारीतून टीबीमुक्त भारताच्या मोहिमेला बळ देण्यासाठी वाराणसीमध्ये विशेष मोहीम सुरू करणार आहोत. फार्मा पार्कच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीबाबत त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे इच्छा व्यक्त केली. हिरानंदानी समूहाचे प्रमुख दर्शन हिरानंदानी यांनी नवीन प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करताना, परदेशी भागीदारांच्या मदतीने सेमीकंडक्टर गुंतवणुकीच्या योजनांवर चर्चा केली. उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांमध्ये गॅस आणि लोअर वितरण टोरेंट पॉवरच्या जिनल मेहता यांनी सांगितले की, कंपनीच्या सध्याच्या प्रकल्पात ५००० नोक-या निर्माण झाल्या असून ९० टक्के स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काम करतानाचे त्यांचे अनुभव उत्साहवर्धक आहे. आम्ही नवीन गुंतवणुकीसह राज्याच्या विकासात सहभागी होऊ.

वेदांता समूहाचे प्रमुख अनिल अग्रवाल म्हणाले की, आम्ही नोएडामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही क्षेत्रातील मोठे संशोधन आणि विकास प्रकल्प आणण्यास तयार आहोत. सुमारे ५०० भारतीय आणि परदेशी लोकांना येथे रोजगार मिळेल. मोबाईल आणि टॅब्लेटवर वापरल्या जाणा-­या काचेच्या निर्मितीसाठी गोरखपूरमध्ये काच उत्पादन युनिट उभारण्याची योजना आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे ​​संजीव मेहता यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना सांगितले त्यांच्या कंपनीचे एटा, ओराई, हमीरपूर इत्यादी ठिकाणी पाच युनिट्स कार्यरत आहेत. त्याच्या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून, दोन वर्षांत मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »