khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

खा. रावसाहेब दानवे बर्फवृष्टीच्या मोहात !

औरंगाबाद I जम्मू-काश्मीरमध्ये सध्या यंदाच्या मोसमातील छान बर्फवृष्टी होत असून इथले वातावरण पर्यटकांना भुरळ घालणारे बनले आहे. या वातावरणाच्या मोहात आता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील पडले आहेत. इथल्या बर्फवृष्टीमध्ये गुडूप झालेल्या श्रीनगर रेल्वे स्टेशनचे काही फोटो त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.  https://khabarbat.com साठी पाठवलेल्या त्यांच्या या पोस्टची सध्या खूपच चर्चा आहे.

जम्मू-कश्मीरच्या बनिहालपासून बडगामपर्यंतचा काश्मीर खोऱ्याचा भाग जणू बर्फाच्या दुलईत लपेटला गेल्यासारखा दिसत आहे. या बर्फाच्या दुलईतून रेल्वे जात असल्याचा एक व्हिडिओ देखील दानवे यांनी ट्विट केला आहे.

दरम्यान, दानवे यांनी ट्विट केलेले फोटो इतके भुरळ घालणारे आहेत की, त्यामुळे तुम्हालाही श्रीनगरला भेट देण्याची इच्छा निर्माण होईल. या मोसमातील बर्फवृष्टीमुळं श्रीनगरचे रेल्वे स्टेशनच बर्फामध्ये हरवून गेले आहे. त्याचबरोबर रेल्वे रुळही बर्फाच्या चादरीत गुडूप झाले आहेत. इथला सुर्योदयही अत्यंत सुंदर दिसला. अनेकांना श्रीनगरचे हे दृश्य खूपच आवडले आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »