khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Bharat Jodo : देश-विदेशातून ‘भारत जोडो’साठी यात्री दाखल

नांदेड :  देश – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. कित्येक किलोमीटर रस्ता प्रचंड गर्दीने फुलून गेला होता. यावेळी इंडियन ओव्हरसीस काँग्रेस यूएसएचे अध्यक्ष मोहिंदर सिंग गिलझियन आणि जर्मनीतील आयओसी युरोप संघटनेचे सरचिटणीस बलविंदर सिंग गुरुदासपुरीया यात्रेकरूंसोबत सामील होण्यासाठी आले होते. अमेरिकेहून भारतात खास भारत जोडो पदयात्रेसाठी आल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आजच दाखल झालो आहोत. आम्ही ‘नफरत छोडो, भारत जोडो’चा संदेश घराघरात पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यूयार्कमध्ये टाइम्स स्केअर ते युनियन स्केअर मधील गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत त्यांनी नुकतीच तीन किलोमीटर पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ यात्रेला पाठिंबा दर्शविला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना भेटून ते यात्रेत सहभागी झाले. नायगाव येथील प्रणिता प्रकाश कांबळकर ही बारा वर्षाची मुलगी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन रस्त्याच्या कडेला आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांसहित उभी होती.आम्हाला राहुल गांधीना पाठबळ द्यायचे आहे, असे तिने सांगितले.

लोहा गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना थेट खात्यावर पैसे पाठविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवण्यासाठीच आम्ही राहुल गांधींच्या सोबत यात्रेत आहोत, असे ते शेतकरी सांगत होते.

 

केंद्रीय आणि राज्य पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकाश लांडगे अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक तरुणी हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. देशसेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. पण आम्हाला संधी मिळायला हवी, असे त्यामधील संध्या सानीने सांगितले.

तुपा, जवाहर नगरच्या वेशीवर शारदाबाई कदम या राहुलजी गांधींचे औक्षण करण्यासाठी उभ्या होत्या. त्याचबरोबर देवकीनंदन गोरक्षण आश्रमाच्या वतीने महिला पुरुषांसह सर्व सदस्य हार – आरती, झेंडे घेऊन आले होते. काकांडीच्या पुढे सायलो कोटलवार हे भटक्या जमातीतील तरुण कडकलक्ष्मीच्या पारंपरिक वेशात यात्रेत सहभागी झाले होते.. महाराष्ट्राची वारकरी परंपरा दर्शविणारे दृश्य बाभळगाव येथे पाहायला मिळाले नांदेडच्या देगलूर नाक्यावर पंजबी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत भांगडा नृत्य सादर करून संस्कृतीचे दर्शन घडवले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like