khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही : मकरंद अनासपुरे

भोकरदन येथे मित्र मंडळाच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव.

भोकरदन : चांगल्या कामाचे वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही त्याचप्रमाणे स्वतः सुखवस्तू जीवन जगत असताना इतरांच्या जीवन जगण्यांचा जे विचार करतात तीच खरी माणुसकी समाजासाठी केलेल्या चांगल्या कामाचे आयुष्यभर समाधान लागते असे प्रतिपादन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भोकरदन येथे ॲड. हर्षकुमार जाधव मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कर्तृत्ववान व्यक्तींच्या गौरव सोहळ्यात केले.

 यावेळी व्यासपीठावर से.नि.विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल , से.नि.जिल्हाधिकारी बी.जी.पवार ॲड व्ही.डी. सोळंके (अध्यक्ष महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सील) शेख सादिक अहेमद (उद्योजक सेंट्रल इंडिया ट्रान्सपोर्ट) ऋतुजा एस.देशपांडे (मानव संसाधन प्रमुख) ॲड हर्शकुमार जाधव, ॲड वीरेंद्र देशमुख , नारायणराव जिवरख, विलास शिंदे , फैसल चाऊस यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनासपुरे म्हणाले की, विचार माणसाला घडवतो व बिघडवतो त्यासाठी नेहमी माणसाने चांगल्याच कामाचा विचार करावा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात नदी पुनर्जीवन , तलावातील गाळ काढणे आधी कामातून विविध गावात समाज उपयोगी काम केलेले आहे भोकरदन येथील मित्र मंडळ ही आता आमच्या नाम फाउंडेशनशी जोडले गेले आहे. बीड मधील एका शेतकऱ्याला आम्ही आत्महत्या करण्यापासून रोखले त्याच्या कुटुंबाला योग्य ती आर्थिक मदत ही पुरविली आज त्या शेतकऱ्याची मुलगी एमबीबीएस डॉक्टर झालेली आहे असे उदाहरणही मकरंद अनासपुरे यांनी यावेळी दिले.

यावेळी मित्र मंडळाच्या वतीने, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आदर्श शिक्षण संस्थाचालक आदर्श शिक्षक प्रगतिशील शेतकरी पत्रकार गुणवंत विद्यार्थी खेळाडू व आदर्श नगराध्यक्ष यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींचा, सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष ॲड हर्षकुमार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन नारायणराव जीवरख व आदर्श शिक्षक संजय शास्त्री यांनी करून आभार मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्र मंडळाचे विलास शिंदे जयंत जोशी विश्वास जाधव मुकुंदराव इंगळे तरुण पानसरिया सुहास जाधव यांनी विशेष परिश्रम केले यावेळी कार्यक्रमाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महादू सिंग डोभाळ, योगेश शर्मा गणेशराव रोकडे , डॉ ओमप्रकाश गोधा सरपंच रामसिंग डोभाळ, जाफराबादच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने ,संजय लहाने, माजी नगरसेवक कदिरबापु शब्बीर कुरेशी, नसीम पठाण, हमदू चाऊस, संजय पारख, विकास जाधव, आदर्श शिक्षक संतोष देशपांडे, वाघ गुरुजी, देठे गुरुजी, एडवोकेट गणेश ठोंबरे यांच्यासह भोकरदन शहरातील प्रतिष्ठित व्यापारी डॉक्टर विविध व्यावसायिक महिला व तरुण मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like