khabarbat

khabarbat logo

Join Us

Advertisement

Baby Powder : ‘जॉन्सन अँण्ड जॉन्सन’ बेबी पावडरवरून हायकाेर्टात घमासान

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या ‘बेबी पावडर’ या उत्पादनाला हानिकारक ठरवत कारवाई केली होती. या कारवाईविरोधात आता कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र या न्यायालयाने कंपनीला काही दिलासा दिला नाही.

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचे ‘बेबी पावडर’ हे उत्पादन अतिशय प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून या उत्पादनाविषयी वेगवेळ्या बाबी समोर आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने १५ सप्टेंबर रोजी बेबी पावडरवर कारवाई केली. या पावडरमध्ये लहान मुलांना प्रतिबंधित करणाऱ्या घटकांचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतात, असे एफडीएचे म्हणणे आहे. त्यामुळे या पावडरवर बंदीची कारवाई करण्यात आली.                               

मात्र या निर्णयाविरोधात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. हा निर्णय मनमानी करणारा आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. आज हायकोर्टाने कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एफडीएने ज्या अहवालाच्या आधारे कारवाई केली तो कंपनीला उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेले आहेत. १९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. एफडीएच्या बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणी केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात केंद्र सरकार काय भूमिका घेणार आणि कोणत्या अहवालाच्या आधारे एफडीएने कारवाई केली, तेही लवकरच स्पष्ट होईल.
web heading : Johnson and Johnson runs to high court on the issue of Baby Powder.  ‘खबर बात’ अर्थात https://khabarbat.com आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, आमचे You tube चॅनल आजच Subscribe करा.

 

 

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »