जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्य उद्योगाला जागा! शिरसाटांवर इम्तियाज जलीलांचा आरोप
संभाजीनगर : प्रतिनिधी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याभोवती वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. हॉटेल विट्स लिलाव वादाच्या सावटातून अजून सावरत नाहीत, तोवर आता माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शेंद्रा एमआयडीसी परिसरात ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला तब्बल २१ हजार चौरस फूट…