khabarbat

NIA

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

संभाजीनगरसह १७ ठिकाणी NIAचे छापे; तिघे ताब्यात

News Network
मुंबई : अमरावती, भिवंडी, छत्रपती संभाजीनगरसह १७ शहरांमध्ये NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे टाकले. एनआयएने अमरावतीच्या छायानगर मधून एकाला आणि भिवंडीच्या खोणी खार पाडीमधून दोघांना ताब्यात घेतले. हे तिघे तरुण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती उघडकीस आली.

छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागात असलेल्या २२ वर्षीय तरुणाला ‘एनआयए’ ताब्यात घेतले. भिवंडीतील खोणी खारपाड ग्रामपंचायत परिसरातून ४५ वर्षीय कामरान अन्सारीला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय अमरावतीतील छायानगरमधून ३५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या एनआयएकडून तिघांची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा देशविरोधी कारवाया करणा-या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे. वर्षभरात ‘एनआयए’ने केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे.

भिवंडी शहरालगतच्या खोणी-खाडीपार ग्रामपंचायत परिसरात ‘एनआयए’ने सापळा रचून एका इसमाला ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव कामरान अन्सारी असे आहे. पाकिस्तानमधील भारतविरोधी संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरून कामरान याला ताब्यात घेतले आहे. कामरान अन्सारी याने आपल्या ग्रुपमध्ये किती जणांना जोडले आहे तसेच त्याचा कोण कोणत्या देश विरोधी संघटनेची संबंध आहे. कोणकोणत्या हालचाली चालू होत्या व काय प्लान आखला जात होता या संपूर्ण घटनेची चौकशी सध्या NIAची टीम करीत आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »